घरमनोरंजनसलमानसोबत २६ वर्षे असणाऱ्या बॉडीगार्ड शेराने पहिल्या भेटीचा केला खुलासा

सलमानसोबत २६ वर्षे असणाऱ्या बॉडीगार्ड शेराने पहिल्या भेटीचा केला खुलासा

Subscribe

मालकाने जे काही संगितले ते मी ऐकले आहे. आणि हेच महत्वाचे कारण आहे की मी त्यांच्या घरातील एक महत्वपूर्ण भाग आहे.

बॉलिवूडचा दबंग हीरो सलमान खानच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांची तसेच प्रसार माध्यमांची सुद्धा बारीक नजर असते. आणि त्या सोबतच सलमान बरोबर नेहमी सावली सारखा असणार्‍या बॉडीगार्डची चर्चा आपसूकच लोकांमध्ये होऊ लागली. सलमान सोबत सतत वावरणार बॉडीगार्ड नेमका आहे तरी कोण? हे जाणण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता वाढू लागली आणि आपसूकच सलमान सोबतच त्याचा बॉडीगार्ड शेरा हा देखील एक सेलेब्रिटी चेहरा बनून लोकांसमोर पुढे येऊ लागला. नुकतच शेराने सलमान आणि त्याची भेट नेमकी कशी झाली याचा खुलासा केला आहे. शेराने मुलाखती दरम्यान उघड केलं आहे की, ते दोघही पहिल्यांदा हॉलिवूड सिंगर Whigfield याच्या शो दरम्यान भेटले होते. तेव्हा शेरा त्या शो मधील सिक्योरिटी सांभाळत होता. आणि दुसर्‍यांदा त्यांची भेट अभिनेता Keanu Reeves याच्या भारतदोर्‍या दरम्यान घडली. तसेच सलमान खान सोबत मी माझा पहिला -वहिला शो चंडीगढ़ मध्ये केला होता आणि तेव्हा पासून ते अत्तापर्यंत 26 वर्षे झालीत आम्ही एकत्र आहोत. तसेच मुलाखती दरम्यान शेराने त्याचा मुलगा टाईगर याला सलमान खान बॉलिवूड मध्ये लवकरच लॉन्च करणार आहे अशी माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Being Sheraa (@beingshera)

- Advertisement -

या मुलाखती व्यतिरिक्त शेराने 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखती मध्ये म्हंटले होते की, मी त्या घोड्या सारखा आहे ज्याला नवरदेवाला लग्नात घेऊन जाण्यासाठी तयार केले जाते. मला फक्त माझ्या मालकाची काळजी आहे. जिथे कुठेही ते जाणार मी त्यांच्या मागे असणार. मी ‘येस मॅन’ आहे. आजपर्यंत मालकाने जे काही संगितले ते मी ऐकले आहे. आणि हेच महत्वाचे कारण आहे की मी त्यांच्या घरातील एक महत्वपूर्ण भाग आहे.


हे हि वाचा – ‘KBC13’मध्ये सहभागासाठी या 3 गोष्टी गरजेच्या, जाणून घ्या कसे पोहोचाल हॉट सीटवर ?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -