जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावरून घेण्यात आले ताब्यात, शोसाठी जात होती परदेशात

जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावरून घेण्यात आले ताब्यात, शोसाठी जात होती परदेशात

जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावरून घेण्यात आले ताब्यात, शोसाठी जात होती परदेशात

शोसाठी पदेशात जाणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. जॅकलीन फर्नांडिसविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लूक आऊट नोटीस जारी केल्यानंतर तिला परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही परवानगीशिवाय जॅकलिन भारत सोडून जाऊ शकत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलीन फर्नांडिस तिच्या शोसाठी परदेशात जात होती पण तिला विमानतळावरच थांबवण्यात आले. जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी याच प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी केली होती.

ईडीने २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील आर्थिक व्यवहाराचे पुरावे केंद्रीय एजन्सीला मिळाले होते. ईडीने सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ७,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

रिपोर्ट्सनुसार, चार्जशीटमध्ये चंद्रशेखरने चौकशीदरम्यान खुलासा केला की, त्याने जॅकलिनला ५२ लाख रुपयांचा घोडा आणि चार पर्शियन मांजरी भेट दिल्या होत्या, यातील एक मांजरीची किंमत ९ लाख रुपये इतकी होती. याशिवाय त्याने जॅकलिनला हिरे जडीत दागिन्यांचा सेट, क्रॉकरी आणि इतर भेटवस्तूही दिल्याचे सांगितले आहे.

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी केली. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरच्या वकिलांनी जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती असा खुलासा केला. पण जॅकलीनने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जॅकलिनच्या वकिलांनी सांगितले की, ‘ईडीने जॅकलिन फर्नांडिसला साक्षीदार म्हणून बोलावले होते, तिने जबाब नोंदवला असून यापुढेही ती ईडीच्या तपास कार्याला पूर्णपणे सहकार्य करेल.’

मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, ‘तिहार तुरुगांतून २०० कोटी वसूल करणारा आरोपी सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करायचा. तो स्पूफिंगद्वारे तिहार तुरुंगातून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जातेय. यावेळी जॅकलिनला त्याने महागड्या वस्तू आणि काही गिफ्ट पाठवल्या होत्या. मात्र चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारा किंवा फोन करणारा व्यक्ती जेलमध्ये असल्याचे माहिती नव्हती असे सांगितले आहे.


 

First Published on: December 5, 2021 8:29 PM
Exit mobile version