‘अवतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांना भारतीय संस्कृतीची भुरळ

‘अवतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांना भारतीय संस्कृतीची भुरळ

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘अवतार द वे ऑफ वाटर’ सध्या संपूर्ण जगभरात चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमरुन यांनी केले असून येत्या 16 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अनेकांच्या मते हा चित्रपट भारतातील हिंदू धर्माशी निगडीत आहे. शिवाय या चित्रपटाचे नाव देखील अवतार आहे जे हिंदू धर्मात पुनर्जन्म दर्शवते. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅनरुन यांच्या मते, “हिंदूंचा पूर्ण देव समूह खूप जास्त समृद्ध आणि जीवंत आहे. मला यांच्या पौराणिक कथा आणि सर्व काही खूप जास्त आवडतं.”

भारतामध्ये प्रसिद्ध आहेत जेम्स कॅमरुन
मूळचे कॅनाडाचे असणारे 68 वर्षांचे चित्रपट दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांचे चित्रपट भारतामध्ये खूप लोकप्रिय ठरले आहेत. ‘टर्मिनेटर’ सीरीजचे दोन्ही चित्रपट भारतीय प्रेक्षकांचे आवडते चित्रपट आहेत. याव्यतिरिक्त संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरलेला त्यांचा टायटॅनिक चित्रपट देखील लोकप्रिय ठरला या चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या चित्रपटाला भारतातील अनेक भाषांमध्ये डब करण्यात आलं. तसेच 2009 साली प्रदर्शित झालेला अवतार देखील भारतात सुपरहिट
ठरला होता.

2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेभारतातील ‘या’ भाषांमध्ये होणार प्रदर्शित
दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 16 मे 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच हा इंग्लिश, हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

…तर मी चित्रपट तयार करणं सोडून देईन, ‘द काश्मीर फाईल्स’ वादावर विवेक अग्निहोत्रींचे आव्हान

First Published on: November 30, 2022 9:32 AM
Exit mobile version