घरमनोरंजन...तर मी चित्रपट तयार करणं सोडून देईन, 'द काश्मीर फाईल्स' वादावर विवेक...

…तर मी चित्रपट तयार करणं सोडून देईन, ‘द काश्मीर फाईल्स’ वादावर विवेक अग्निहोत्रींचे आव्हान

Subscribe

सध्या गोव्यातील ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये IFFI 2022 चे प्रमुख परिक्षक नदव लॅपिडने या चित्रपट महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधला होता. तसेच या चित्रपटाबाबत काही वादग्रस्त वक्तव्य देखील केली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी त्यांच्या टीका करु लागले आहेत. दरम्यान, आता ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं मोठं व्यक्तव्य समोर आले आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, ‘द काश्मीर फाईल्स’मधील एक सीन हे सिद्ध करेल की तो चूकीचा आहे. तर मी चित्रपट तयार करणं सोडून देईन…”. अशा प्रकारचं मोठं वक्तव्य विवेक अग्निहोत्री त्यांनी केलं असून या व्हिडीओ त्यांनी लिहिलंय की, “दहशतवादाचे समर्थक आणि नरसंहाराला नकार देणारे मला कधीही गप्प करु शकत नाहीत….जय हिंद….द काश्मीर फाईल्स #खरी गोष्ट….”

- Advertisement -

व्हिडीओमध्ये काय म्हणाले विवेक अग्निहोत्री
शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले की, मित्रांनो गोवामधील IFFI 2022 महोत्सवामध्ये एका परिक्षकाने सांगितलं की, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट एक व्हल्गर आणि प्रचार करणार चित्रपट आहे…माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. कारण याप्रकारच्या गोष्टी तर सर्व दहशतवादी समर्थक आणि भारताचे तुकडे करणारे लोक नेहमीच बोलत आले आहेत. परंतु माझ्यासाठी जे सर्वात आश्चर्यचकित हे आहे की, हे वक्तव्य भारत सरकारने आयोजित केलेल्या भारत सरकारच्या व्यासपीठावर काश्मीरला भारतापासून वेगळं करणाऱ्या लोकांच्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यात आला आणि या गोष्टीला भारतामध्येच राहणारे अनेक भारतीयांनी त्याचा वापर केला. भारता विरुद्ध. हे लोक कोण आहेत? हे तेच लोक आहेत जे काश्मीर फाईल्ससाठी 4 वर्षांपूर्वी जेव्हा मी रिसर्च सुरु केला होता तेव्हापासून या चित्रपटाला प्रचार म्हणत आहेत.”

पुढे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं की, “700 लोकांचे पर्सनल इंटरव्यू घेतल्यानंतर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ते 700 लोक ज्यांचे आई-वडील, भाऊ-बहीणींना सर्वांनसमोर मारुन टाकण्यात आलं. सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दोन तुकड्यांमध्ये वाटण्यात आलं होतं. तो सर्व प्रचार होता? आणि ते अश्लील बोलत होते का.”

- Advertisement -

नदव लॅपिडचं वादग्रस्त वक्तव्य

IFFI 2022 महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांना प्रमुख परिक्षक म्हणून होते. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर चांगलाच निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “या महोत्सवातील 15 वा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आम्ही खूप निराश आहोत. आम्हाला वाटते की हा चित्रपट एका विशिष्ट विचारांचा प्रचार करणारा आणि असभ्य आहे. एवढ्या मोठ्या महोत्सवात या चित्रपटाला स्थान मिळणं चूकीचं आहे.”


हेही वाचा :

राजकीय अजेंड्यासाठी द काश्मीर फाइल्सचा वापर; पल्लवी जोशींची खंत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -