जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत बहीण खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत बहीण खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत बहीण खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूडमधील स्टार्स किड्स नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. सध्या अनेक बॉलिवूड स्टार किड्स चित्रपट, वेबसीरिज, जाहिरातीसह विविध माध्यमातून अभियन विश्वात पदार्पण करत आहेत. अशा स्टार किड्स अभिनेत्री जान्हवी कपूर हिने देखील बॉलिवूड सृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज जान्हवीचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने तिने लाखो चाहत्यांची मनं जिंकली. जान्हवी कपूपर पाठोपाठ आता तिची बहीण खुशी कपूरसुद्धा तिच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज झाली आहे. एका चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

जान्हवीचे अभिनय क्षेत्रातील यश पाहता वडील बोनी कपूर खुशीसाठी सुद्धा नवीन चित्रपट शोधण्याची तयारी करत होते. अशात गेल्या काही दिवसांपूर्वी खुशीचा अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदासोबतच एक व्हिडीओ व्हायरल झाला होत. त्यामुळे अगस्त्य आणि खुशी एकत्र एका चित्रपटात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या मात्र आता खुशी, अगस्त्य आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोबत जोया अख्तरच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. मात्र याबाबत काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

परंतु जोया अख्तर दिग्दर्शित ‘आर्चीज’च्या हिंदी रिमेकमध्ये हे तिघे स्टारकिड्स एकत्र दिसणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान बोनी कपूर यांनी खुशी एप्रिलमध्ये तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र खुशी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याआधीपासूनचं तिच्या फोटो आणि व्हिडीओंना सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळत आहे. त्यामुळे एकेकाळी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नंतर त्यांची दुसरी मुलगी बॉलिवूडमध्ये कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट


First Published on: February 27, 2022 6:09 PM
Exit mobile version