Shridevi Death Anniversary: आईच्या आठवणींना मुलींनी दिला उजाळा, श्रीदेवीचा ‘जूली’ ते ‘मॉम’पर्यंतचा प्रवास

Shridevi Death Anniversary: आईच्या आठवणींना मुलींनी दिला उजाळा, श्रीदेवीचा ‘जूली’ ते ‘मॉम’पर्यंतचा प्रवास

Shridevi Death Anniversary: आईच्या आठवणींना मुलींनी दिला उजाळा, श्रीदेवीचा 'जूली' ते 'मॉम'पर्यंतचा प्रवास

बॉलिवूडची चांदणी म्हणजेच श्रीदेवी. फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी श्री देवी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. श्री देवीची आज तिसरी पुण्यतिथी. २४ फेब्रुवारी २०१८ ला श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. मोहित मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी सहपरिवार दुबईला गेली होती. श्रीदेवीने आपल्या सहजसोप्या अभिनय आणि सौंदर्य  अदाकारीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. बॉलिवूडची चांदणी म्हणून श्रीदेवीला ओळखले जात होते. वयाच्या चौथ्या वर्षी श्रीदेवीने तिची अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. सुरुवातीच्या काळात अनेक साऊथ इंडियन सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून काम करत होती. वयाच्य ५१व्या वर्षी श्रीदेवीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बॉलिवूडच्या करिअरमध्ये श्रीदेवीने ३००हून अधिक सिनेमे केले आहेत. ‘मॉम’ हा सिनेमा श्रीदेवीच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमाने श्रीदेवीला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मरणोत्तर पुरस्कार मिळवून दिला होता. बॉलिवूडच्या चांदणीची अकाली एक्झिट तिच्या चाहत्यांना चटका लावून गेली होती. आजही श्रीदेवीच्या आठवणी ताज्या आहेत.

‘जूली’ या सिनेमातून श्रीदेवीने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ८० ते ९० च्या दशकातील श्रीदेवी ही सर्वात प्रसिद्ध आणि करिअरच्या शिखरावर आपली मुहूर्तमेळ रोवणारी अभिनेत्री होती. त्या काळात श्रीदेवी तिच्या एका सिनेमासाठी तब्बल १ करोड रुपये मानधन घेत होती. मिस्टर इंडिया, चालबाज, नागीन, जुदाई यासांरखे अनेक दमदार आणि सुपरहिट सिनेमातून श्रीदेवीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मधल्या काळात श्रीदेवी सिनेसृष्टीपासून लांब होती. मात्र त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी ‘इग्लिश विग्लिंश’ या सिनेमातूवन दमदार पुर्नागमन केले होते. आपल्या मनमोहक सौदर्य आणि अभिनयाने श्रीदेवीने सर्वांनाच मोहिनी घातली होती. मात्र तिच्या सौंदर्यावर खऱ्या अर्थाने भाळला तो म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक बोनी कपूर.  ११९६मध्ये श्रीदेवीने बोनी कपूर सोबत लग्न करुन संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का दिला होता. बोनी कपूरचे आधी लग्न झाले होते. त्याला दोन मुले असतानाही श्रीदेवीने त्याच्यासोबत लग्न केल्याने तिच्यावर अनेक टिकाही झाल्या होत्या. श्रीदेवीला बोनी कपूरपासून जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशा दोन मुली आहेत. आईच्या पश्चात दोन्ही मुली आत अभिनय क्षेत्रात उतरल्या आहेत.

आईच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त जान्हवी कपूरही भावूक झाल्याचे दिसून आले आहे. तिने सोशल मीडियावरून श्रीदेवीने तिच्यासाठी लिहिलेली एक नोट पोस्ट केली आहे. ‘आय लव्ह यू माय लब्बू, तू जगातील सर्वात चांगली मुलगी आहेस’, असे त्या नोटमध्ये श्रीदेवीने लिहिले आहे. ‘मला तुझी खूप आठवण येतेय’, असे म्हणत जान्हवी कपूरने एक पोस्ट शेअर केली. त्याचबरोबर श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूरने आईच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूरचा जुना फोटो खुशीने शेअर केला आहे.


हेही वाचा – Sridevi’s 3rd Death Anniversary: बघा, आठवणीत राहणारे Top 5 Looks

First Published on: February 24, 2021 5:27 PM
Exit mobile version