घरट्रेंडिंगSridevi's 3rd Death Anniversary: बघा, आठवणीत राहणारे Top 5 Looks

Sridevi’s 3rd Death Anniversary: बघा, आठवणीत राहणारे Top 5 Looks

Subscribe

तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी जन्मलेल्या श्रीदेवीचं नाव श्रीअम्मा यंगर अय्यप्पन असं नाव आहे. ‘कंधान करुणाई’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून श्रीदेवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात श्रीदेवींनी अभिनय केला होता. यानंतर श्रीदेवींनी ९० च्या दशकात हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपले वर्चस्व गाजवले. यासह श्रीदेवींनी चित्रपटात केलेल्या नृत्य शैलीसह आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी कोणतीही भूमिका अगदी सहजतेने निभावली. श्रीदेवीच्या ‘हवा हवाई’ या गाण्यातील अभिनयाने संपूर्ण देशाला वेड लावले. यासह तिच्या विनोदी चार्ली चॅपलिनच्या सीनने प्रेक्षकांना थक्कच केले होते. श्रीदेवींचे हे दोन्ही लूक चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरताय.

- Advertisement -

श्रीदेवी यांनी प्रत्येक चित्रपटातून, प्रत्येक भूमिकेतून आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या याच कार्याची आणि ‘मॉम’ चित्रपटातील कामगिरीची दखल घेत त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने देखील अभिनय केला होता. श्रीदेवी यांच्या निधनानंतरचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी पती बोनी कपूर यांनी स्वीकारला होता.

२०१२ साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. या चित्रपटाचत श्रीदेवींनी एका सामान्य गृहिणीची भूमिका साकारली होती. यामध्ये तिला इंग्रजी भाषेचे कोणतेही ज्ञान नसते. त्यामुळे तिचा पती आणि मुले तिची थट्टा करतात.

श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ,तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ‘जुदाई’ चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. अभिनेत्री श्रीदेवी यांचं २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत अकस्मात निधन झालं.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -