जान्हवी कपूरने ईशान खट्टरसाठी बनवली बिर्याणी

जान्हवी कपूरने ईशान खट्टरसाठी बनवली बिर्याणी

रविवारच्या स्पेशल जेवणासाठी ‘सडक’ चित्रपटातील जोडी शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या घरी हजेरी लावली. मीराने या स्पेशल पार्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने चाहत्यांना मेनुची देखील माहिती दिली आहे. या स्पेशल रविवारी चक्क जान्हवी कपूरने शाकाहारी बिर्याणी बनवली आहे. या शाकाहारी बिर्याणीचा फोटो मीरा राजपूरतने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मीराने जान्हवीचे कौतुक करा असं देखील सांगितलं आहे. या जेवणात सॅलड्स, ऑलिव्ह, पिटा ब्रेड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आहे. मीरा कपूरने हा फोटो ईशान, शाहिद आणि एलिझा शेख यांना टॅग केला होता.

‘धडक’ या चित्रपटातून जान्हवी कपूरने बॉलिवूड चित्रपटात पदार्पण केले. या अगोदर जान्हवी आणि ईशान खट्टरच्या अफेर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र या अफवा सत्य नसल्याचे या दोघांनी सांगितले होते.

हेही वाचा फरहान अख्तरचा हात फॅक्चर; बॉक्सिंग करण पडल महागात!

‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये करण जौहरने शाहिद कपूर असा प्रश्न विचारला की, ‘ईशान आणि जान्हवी मध्ये कोणतं नातं आहे?’ या प्रश्नावर शाहिद कपूर म्हणाला, ‘जान्हवी ही त्याच्यासोबत सतत असते. ईशान म्हणाला होतो, ‘आम्ही दोघं एकत्र जिमला जातो, गाणी ऐकतो, संपूर्ण दक्षिण भारतीयांचे संगीत जे मला आवडत नव्हते पण आता ते मला खूप आवडू लागले आहे. तसंच आम्ही एकत्र चित्रपट पाहतो आणि जेवण देखील करतो.’

दुसऱ्या एका मुलाखतीत जान्हवी ईशानबद्दल असं म्हणाली की, ‘मी ईशानच्या चित्रपटातील सीन करण्याच्या शैलीमुळे खूप प्रभावित आहे. एक अभिनेता म्हणून त्याच्याकडे खूप पॉवर आहे. कारण तो या क्षेत्रात नवीन आहे म्हणून. मात्र त्याच्या अभिनयाबाबत त्याच्याकडे जास्त अनुभव असल्यामुळे त्याची मला मदद मिळाली.’

जान्हवी कपूर सध्या गुंजन सक्सेनावर आधारित असलेल्या चित्रपटात काम करत आहे. तसंच त्यानंतर ती ‘दोस्तान २’ या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. ईशान मीरा नायरच्या ‘ए सुवेबल बॉय’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘काली पीली’ असं आहे.

First Published on: October 13, 2019 6:37 PM
Exit mobile version