घरट्रेंडिंगफरहान अख्तरचा हात फॅक्चर; बॉक्सिंग करण पडल महागात!

फरहान अख्तरचा हात फॅक्चर; बॉक्सिंग करण पडल महागात!

Subscribe

'तूफान' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता फरहान अख्तरचा हात फॅक्चर झाल्याची घटना घडली असून त्यांनी हाताचा एक्स रे रिपोर्ट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

एखाद्या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना अनेक दुखापतीच्या घटना घडल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी एबीसीडी स्ट्रीट डान्सर (ABCD Street Dancer) चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना अभिनेता वरुण धवन याला देखील दुखापत झाली होती. तर ‘वॉर’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना वाणी कपूरला देखील जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता ‘तूफान’ चित्रपटच्या शूटिंग दरम्यान अभिनेता फरहान अख्तरला देखील हाताला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती स्वत: फरहान यांनी त्याच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरुन दिली आहे.

- Advertisement -

फरहान अख्तरला दुखापत

तूफान या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना फरहान अख्तर हा बॉक्सिंगची भूमिका साकारत होता. त्या दरम्यान, त्याच्या हाताला अचानक दुखापत झाली. या दुखापतीत अभिनेता फरहान याचा हात फॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत फरहान यांनी त्याच्या चाहत्यांना स्वत:च्या इंस्टाग्रामवरुन हाताचा एक्स रे रिपोर्ट शेअर करत हेअर लाइन फ्रॅक्चर झाल्याची माहिती दिली आहे. त्या फोटोमध्ये त्यांनी मार्क करुन हाताच्या कोणत्या ठिकाणी फॅक्चर झाले आहे, याची देखील माहिती दिली आहे. तसेच त्यांनी फोटो शेअर करत ‘बॉक्सिंग मधील ही माझी पहिली दुखापत’, असल्याचे देखील सांगितले आहे.

ड्र्यू नीलने दिले बॉक्सिंगचे ट्रेनिंग

‘तूफान’ या चित्रपटात फरहान अख्तर यांनी एका बॉक्सरची भूमिका साकारली असून फरहानला ‘तूफान’ साठी किक बॉक्सिंगचे ट्रेनिंग या खेळाचे माझी विश्व चॅम्पियन ड्रयू नील यांनी दिले आहे. तसेच नील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फरहानच्या ट्रेनिंग सेशनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील शेअर केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – वाढदिवसानिमित्त स्पृहाचे हटके लूक!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -