‘तुम्हाला काही शिस्त नाही ना’; फोटोग्राफरवर जया बच्चन संतापल्या!

‘तुम्हाला काही शिस्त नाही ना’; फोटोग्राफरवर जया बच्चन संतापल्या!

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचं वडील सूरज मल्होत्रा यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. ते आपल्या नव्वदीमध्ये असून काही दिवस आजारी होते. तर सोमवारी १८ नोव्हेंबरला बॉलीवुडमधील अनेक अभिनेते श्रध्दांजली वाहण्यासाठी मनीष मल्होत्राच्या घरी गेले. तर ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन देखील त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदासह मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचल्या. इतके सेलेब्रिटीज एका ठिकाणी असल्यामुळे घराबाहेर अनेक फोटोग्राफर्स जमा झाले होते. तर या फोटोग्राफर्सची घरा बाहेर गर्दी पाहून जया बच्चन फार नाराज झाल्या. मनीश मल्होत्राच्या घरातून निघताना जया बच्चन यांनी या फोटोग्राफर्सवर कमेंट केलं जे या व्हिडिओत कळून येतं.

‘तुम्हाला काहीच शिस्त नाही ना? परिस्थितीची तुम्हाला काही जाणीव नाही. तुमच्या घरी जेव्हा अशी काही घटना घडेल तेव्हा मला बघायच आहे की तुमच्यावर काय परिस्थिती असेल ती.’ मनीष मल्होत्राच्या घरातून निघताना जया बच्चन यांनी गर्दी करत असलेल्या फोटोग्राफर्सला सांगितलं. त्यांनंतर आपल्या मुलीसोबत गाडीत बसून त्या निघून गेल्या. त्यांच्या अशा बोलण्याचा फोटोग्राफर्सवर काही परिणाम झाल्याचा दिसत नाही कारण त्यानंतरही ते फोटो काढताना दिसत आहेत. तर हा व्हिडिओ नेटकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना देखील जया बच्चन यांचं म्हणनं योग्य वाटलं.

नेटकरीनं व्हिडिओवर केलेलं कमेंट
जया बच्चन यांचं म्हणनं नेटकऱ्यांना योग्या वाटलं

जया बच्चन यांनी फोटोग्राफर्सची शाळा घेतलेला हा पहिला किस्सा नाही. या आधी देखील त्यांनी एका मुलाखतीत फोटोग्राफर्सला फोटो काढण्यापासून थांबवलं आहे. जया बच्चन यांच्यासह करण जोहर, करीना कपूर खान, गौरी खान, कियारा अडवानी, अर्जून कपूर आणि अनेक बॉलिवुडचे कलाकार मल्होत्रा यांच्या घरी गेले होते.

हेही वाचा: ‘अखियों से गोली मारे…’, रिमेक गाणं प्रदर्शित!

 

First Published on: November 20, 2019 6:30 PM
Exit mobile version