JuhiChawla5GCase: 20 लाखांच्या भुर्दंडानंतर जुहीने शेअर केला व्हिडिओ

JuhiChawla5GCase: 20 लाखांच्या भुर्दंडानंतर जुहीने शेअर केला व्हिडिओ

अभिनेत्री जुही चावलाला 5G प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी जुहीने 5G नेटवर्क विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय होती. या याचिकेविरोधात हायकोर्टाने जुहीला फटकारले आणि यासोबतच 20 लाखांचा दंडही ठोठावला आहे. या सर्व घटणेनंतर जुहीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत लोकांसमोर आपले मत व्यक्त केले आहे. जुहीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

जुहीने व्हिडिओ मध्ये काय म्हटलं आहे-

“नमस्कार, काही दिवसांपासून एवढा गोंधळ झालाहे की मी स्वत: चा आवाज सुद्धा ऐकू शकले नाही. या गोंधळा दरम्यान मला वाटलं की एक अतिशय महत्त्वाचा मेसेज कदाचित आपण सगळे विसरलो आहोत आणि तो असा होता की आम्ही 5G विरोधात नाही. आम्ही याचं स्वागत करत आहोत. तुम्ही ते जरूर आणा. माझ फक्त एवढचं मत आहे की , 5G सुरक्षित आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं. आम्ही फक्त एवढंच बोलत आहोत आहे की या टेक्नॉलॉजीबाबत तुमचा अभ्यास, संशोधन सार्वजनिक करा, जेणेकरुन आमच्या मनात जी भीती आहे, ती निघून जाईल. आम्ही सगळे निर्धास्तपणे झोपू शकतो. आम्हाला  एवढंच जाणून घ्यायचं आहे की, ही टेक्नॉलॉजी लहान मुलं, गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित आहे.” व्हिडिओ शेअर करत जुहीने कॅप्शन मध्ये ‘Hear(ऐका)’ असे लिहलं आहे.

या तंत्रज्ञानामुळे मानवावर आणि पर्यावर्णावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचे तिचे म्हणणे होते. जुही सध्या पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे मानवी जीवनासह प्राणी आणि वनस्पतींवर दुष्परिणाम होऊ शकेल अशी भीती जुहीने व्यक्त केली होती. त्यामुळेच तिने ही याचिका दाखल केली होती.


हे हि वाचा – ‘महाभारत’ सिनेमात रिया झळकणार ‘द्रौपदीच्या’ भूमिकेत ?

First Published on: June 10, 2021 1:18 PM
Exit mobile version