लवकरच जस्टिन बीबर चढणार बोहल्यावर?

लवकरच जस्टिन बीबर चढणार बोहल्यावर?

पॉप गायक जस्टिन बीबर आपल्या प्रियसीसोबत

जगप्रसिद्ध पॉप गायक ‘जस्टिन बीबर’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विविध कारणांमुळे जस्टिन नेहेमीच चर्चेत राहीला आहे मात्र यावेळी जस्टिन बोहल्यावर चढणार असल्याने चर्चेत आला आहे. जस्टीनने पूर्व प्रेमीका मॉडेल ‘हॅले बाल्डविन’ला लग्नासाठी प्रपोज केला आहे. जस्टिनने प्रपोज केल्यानंतर मॉडेलकडून होकार मिळाला असल्याने आता जस्टिन लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बहामास येथे शनिवारी त्याने या मॉडेलला लग्नासाठी प्रपोज केला. याची माहिती मॉडेलव्दारे ट्विटरवर टाकण्यात आली आहे. मागील दिवसांपासून प्रेमसंबध असलेली ही मॉडेल जस्टीनची पूर्व प्रेमीका आहे. ही बातमी ट्विटवरुन प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का लागला आहे. पॉप गायक सेलेना गोमेझ बरोबर मागील काही महिन्यांपूर्वी जस्टिनचे ब्रेकअप झाले होते. या नंतर जस्टिनचे पून्हा पूर्व प्रेमीका हॅले बाल्डविनच्या प्रेमात पडला होता. जस्टिनच्या आईनेही ट्विटरवर “लव्ह लव्ह लव्ह” असे ट्विट केले आहे.

 

जस्टिन सध्या २४ वर्षांचा आहे. सध्या जस्टिन आणि हॅले बहामाजमध्ये आहेत. जस्टिन १७ वर्षाचा असताना त्याचे हॅले बरोबर त्याचे प्रेमसंबध होते. ज्यावयात करिअरचीही सुरुवात होत नाही त्यावयात जस्टिनच्या गाण्यांनी आज जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जस्टिनच्या सर्व गाण्यांनी तरुणांना भुरळ घातली आहे. प्रसिद्धीबरोबरच त्यावर अनेक आरोपही लागले. जस्टिन नेहेमीच वांदामुळे चर्चेत आला होता. वयाच्या १९ वर्षी संगीतापासून सन्यास घेत असल्याच्या बातमीने त्याच्या चाहते दुखावले होते.

First Published on: July 9, 2018 4:27 PM
Exit mobile version