ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन

शुभांगी जोशी यांनी १९८४ साली निष्पाप या नाटकातून रंगभूमिवर पदार्पण केलं.

केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर सर्वच प्रेक्षकांची लाडकी आजी अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. गोरेगाव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

शुभांगी जोशी यांनी १९८४ साली निष्पाप या नाटकातून रंगभूमिवर पदार्पण केलं. त्यांनतर कुसूम मनोहर लेले या नाटकातील भुमिकाही गाजली. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्या अगदी कोणत्याही भुमिकेत चपखल बसायच्या.शुभांगी जोशी यांनी अनेक मालिकांमधून कामं केली आहेत. त्यांनी साकारलेली आभाळमाया मधील चिंगीच्या आजी म्हणजे  अक्काची भुमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यातील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली. मालिकेतील गौरी आजी ही सगळ्या प्रेक्षकांची लाडकी आजी झाली. मालिकेत मोहन जोशी यांच्या बरोबरचे संवाद ,त्यांच्यातील भांडण प्रेक्षकांना आवडली.  सध्या कलर्स मराठीवर सुरू असलेल्या ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेमध्ये देखील त्या जिजीची भूमिका साकारत होत्या.

माझे आजी आजोबा मी लहान असतानाच गेले. त्यामुळे त्यांच फार काळ अनुभवता आलं नाही. पण याची सगळी कसर शुभांगी आजीने भरून काढली. माझे खूप लाड तीने केले. माझी पहिली मालिका आणि मला एक छान आजी मिळाली होती. मला केक खूप आवडतो. त्यामुळे ती सकाळी लवकर उठून माझ्यासाठी केक करून आणायची. इतके लाड तीने माझे पुरवले. आता या क्षणी मी तीच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येत आहे.

सायली संजीव, अभिनेत्री

वाचा – आजीच्या या भूमिका चांगल्याच गाजल्या

First Published on: September 5, 2018 9:11 AM
Exit mobile version