रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलचं मजेशीर उत्तर

रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलचं मजेशीर उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने बॉलिवूडमधील 90 चा काळ गाजवला. अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करुन प्रसिद्धी मिळवली. काजोलने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु पूर्वीपासूनच काजोलला तिच्या रंगावरुन ट्रोल केलं जातं. अशा ट्रोलर्सना काजोल नेहमीच सडेतोड उत्तर देताना देखील दिसते. अशातच पुन्हा काजोलने रंगावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना गमतीशीर उत्तर दिलं आहे आणि तिचा सावळा रंग गोरा कसा झाला हे देखील तिने सांगितलं आहे.

काजोलची मजेदार पोस्ट चर्चेत
खरं तर, अनेकदा काजोलला तिच्या रंगावरुन ट्रोल केलं जातं. पूर्वी काजोलचा रंग जास्त सावळा होता. पण अलीकडे काजोलचा रंग उजळला आहे. काजोल अलीकडे शेअर करत असलेल्या फोटोंवरुन काजोलच्या रंगात बदल झाल्याचे दिसून येते. अनेकदा युजर्स तिच्या फोटोंवर कमेंट्स करत रंगाबाबत प्रश्न विचारतात. दरम्यान, काजोलने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच काजोलने अशा लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे जे अभिनेत्रीला तिच्या गोऱ्या रंगाचे रहस्य विचारतात.

काजोलच्या या फोटोमध्ये तिचा चेहरा पूर्णपणे मास्कने झाकलेला आहे, काजोलसोबत काजोलने सनग्लासेस देखील घातला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले आहे की, ‘हे उत्तर त्या लोकांना, जे मला गोरा असण्याचे रहस्य वारंवार विचारतात.’ असं काजोल म्हणली.

काजोलचा ‘सलाम वेंकी’ ओटीटीवर होणार प्रदर्शित
नुकत्याच काही दिवसांपूर्वी काजोलने ‘सलाम वेंकी’ चित्रपटातून पुनरागमन केले होते. बॉक्स ऑफिसवर हा फारसा उत्तम चालू शकला नाही. दरम्यान 10 फेब्रुवारी पासून हा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

‘पास आऊट’ लघुपटाचा ‘रिफ 2023 फेस्टिव्हल’ मध्ये डंका

First Published on: February 10, 2023 11:19 AM
Exit mobile version