घरमनोरंजन'पास आऊट' लघुपटाचा 'रिफ 2023 फेस्टिव्हल' मध्ये डंका

‘पास आऊट’ लघुपटाचा ‘रिफ 2023 फेस्टिव्हल’ मध्ये डंका

Subscribe

‘सैराट’ आणि ‘मूळशी पॅटर्न’ फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि त्यांच्या जोडीला अभिनेत्री पायल कबरेची मुख्य भूमिका असलेला आणि दिग्दर्शक राहुल दिलीप सूर्यवंशी दिग्दर्शित “पास आऊट” या लघुपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रथम पारितोषिकाने विजय पटकावून या लघुपटाने चांगलीच बाजी मारली.

‘पास आऊट’ लघुपटाला यंदाच्या मानाच्या नवव्या ‘राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रिफ 2023’च्या फिल्म फेस्टिवलमध्ये या एकमेव मराठी लघुपटाची स्क्रीनिंगसाठी निवड झाली होती. आणि या महोत्सवात “पास आऊट”ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक लघुपट हा पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले. ‘रीफ इंटरनॅशनल फ्लिम फेस्टिवल’ सोबतच ‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स’, ‘गोल्डन स्पॅरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल टिफ’, ‘मड हाऊस इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल’ मध्ये “पास आऊट” या लघुपटाने प्रथम पारितोषिक पटकावले. त्याचबरोबर मानाच्या अशा युके येथील ‘लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स’ येथे ही “पास आऊट”ची निवड झाली होती, ही नक्कीच वाखाणण्याजोगी बाब आहे.

- Advertisement -

“पास आऊट” या लघुपटाची कथा कविता निकम या व्यक्तीवर आधारित आहे. कविता या पात्राने तांत्रिक अभियंता म्हणून शिक्षण पूर्ण केले आहे . तिच्या या करिअरच्या निवडीच्या निर्णयाभोवती ही संपूर्ण कथा फिरतेय. तांत्रिक अभियांत्रिकी ही पुरुषप्रधान व शारिरीक श्रमाची अपेक्षा करणारी फिल्ड असूनही कविता त्यात करिअर घडवण्याच्या हेतूने खडतर मेहनत घेऊन, उत्तीर्ण होऊन प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाते.

अशाच एका मुलाखतीतील प्रसंगावर “पास आऊट” हा लघुपट भाष्य करतो. “पास आऊट” चे लेखन, संकलन आणि दिग्दर्शनाची धुरा राहुल दिलीप सूर्यवंशी यांनी पेलवली आहे. तर लघुपटाला पार्श्वसंगीत अभिजीत सोनावणे यांनी दिले आहे. तर ध्वनीमुद्रणाची जबाबदारी अतुल गायकवाड यांनी सांभाळली आहे. तर या ‘पास आऊट’ लघुपटाला धनराज वाघ यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. “पास आऊट” हा लघुपट आताच्या युवा जनतेच्या आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोनाबाबत महत्त्वाचा लघुपट नक्कीच आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

रणबीर-आलियाला मागे टाकत सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंनी बनवला रेकॉर्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -