Tanisha Mukherjee Corona Positive : काजोलची बहीण ​तनिषा मुखर्जी कोविड पॉझिटिव्ह

Tanisha Mukherjee Corona Positive : काजोलची बहीण ​तनिषा मुखर्जी कोविड पॉझिटिव्ह

Tanisha Mukherjee Corona Positive : काजोलची बहीण ​तनिषा मुखर्जी कोविड पॉझिटिव्ह

गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सरकारने अनेक गोष्टींवर लादण्यात आलेले निर्बंध शिथील केले आहेत. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे आढळून येत आहे. आता या कोरोनाचा शिरकाव बॉलीवूड चित्रपटसृष्टीत होत असल्याचे पाहायला मिळत आहे.अभिनेत्री कोजोलची बहीण तनिषाला मुखर्जी ही कोरोनाची लागण झाली आहे. तनिषाने स्वत: याबाबत माहिती देत सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री काजोलची बहीण तनिष सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.याबाबत तिने कोविड झाल्याची माहिती दिली आहे. सर्वांना नमस्कार, मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मला कोविड विलगीकरण कक्षामध्ये राहावे लागणार आहे, असे तनिषाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अभिनेत्री काजोलची बहीण तनिषाने २००३मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असून, निल अँड निक्की’, ‘सरकार’, ‘सरकार राज’ आणि ‘टँगो चार्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच तनिषा तिच्या आगामी चित्रपटासाठी लखनौला गेली होती. त्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.


 हे ही वाचा – WinterSession 2021: राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन ; काँग्रेस, टीएमसी, शिवसेनेच्या खासदारांवर कारवाई


 

First Published on: November 29, 2021 7:20 PM
Exit mobile version