मुंबई शहरातील प्रेम,नाती, जीवनावर आधारित‘काली पीली टेल्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई शहरातील प्रेम,नाती, जीवनावर आधारित‘काली पीली टेल्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई शहरातील प्रेम, नाती , जीवनावर आधारित‘काली पीली टेल्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अॅमेझॉनची मोफत व्हिडीओ मनोरंजन सेवा– मिनी टीवीने एका आकर्षक ट्रेलरच्या अनावरणासोबत आपली पहिली कथामालिका, ‘काली पीली टेल्स’च्या एक्सक्लूसिव प्रीमियरची घोषणा केली असून 20 ऑगस्ट, 2021 ला ही नवी कोरी सिरिज प्रदर्शित होणार आहे. मैडमिडास फिल्म्सचे अदीब रईस यांच्या दिग्दर्शना अंतर्गत तयार होणाऱ्या आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या ‘काली पीली टेल्स’ मध्ये मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर सहा छोट्या छोट्या कथांचा अतिशय मनोरंजक कथापट मांडण्यात येणार आहे.

‘काली पीली टेल्स’मधून मुंबई शहरातील प्रेम, नातेसंबंध आणि जीवनाच्या जटिलतेला उत्तम प्रकारे दर्शवण्यात आले आहे. यातील सहा अनोख्या कहाण्यांचे कथानक परिवर्तन आणि स्वीकृतिच्या सीमारेषेवर उभे असणाऱ्या तरुणांच्या आणि इथल्या शहरी व्यक्तिरेखांच्या आस पास फिरणारे आहे, यामध्ये विनय पाठक, गौहर खान, सयानी गुप्ता, मानवी गगरू, सोनी राजदान, हुसैन दलाल, शारिब हाशमी, प्रियांक्षी पेन्युली, तन्मय धनानिया, सादिया सिद्दीकी आणि अदीब रईस यांसारखे दिग्गज कलाकार असणार आहेत.

या कथामालिकेतील प्रत्येक कथापट प्रणय, विवाह, धोका, समलैंगिकता, माफी आणि घटस्फोट या विषयांवर केंद्रित असून महानगरीय जीवनातील आणि सध्याच्या डिजिटल युगातील अनिश्चिततेला लक्षात घेऊन, आपापसातील नातेसंबंधांना पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून सादर करते. काली पीली टॅक्सी ही मुंबईची ओळख आहे आणि वेब सिरिजमधील कथांना जोडणारा दुआ देखील आहे. सिंगल झुमका, लव्ह इन ताडोबा, मॅरेज 2.0, फिश फ्राय और कॉफी, हरा भरा आणि लूज एंड्स असे रंजक शिर्षक या एपिसोड्सला देण्यात आले आहेत.


हे हि वाचा – Video: भाग्यश्रीचा पोल डान्स व्हिडिओ पाहून चाहते झाले फिदा

First Published on: August 16, 2021 6:24 PM
Exit mobile version