घरमनोरंजनVideo: भाग्यश्रीचा पोल डान्स व्हिडिओ पाहून चाहते झाले फिदा

Video: भाग्यश्रीचा पोल डान्स व्हिडिओ पाहून चाहते झाले फिदा

Subscribe

भाग्यश्रीचा हा बिंदास्त अंदाज पाहून चाहते देखील खूश झाले आहेत.

‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) या ब्लॉकबस्टर सिनेमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारी अभिनेत्री भाग्यश्रीने (Bhagyashree) आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मैंने प्यार किया या सिनेमात अभिनेता सलमान खान  (Salman Khan) आणि भाग्यश्रीची दमदार केमिस्ट्री दिसून आली होती. आणि अल्पवधीतच हा सिनेमा हिट ठरला. या सिनेमानंतर भाग्यश्री बॉलिवूडमध्ये काही खास चमक दाखवू शकली नाही. मात्र सोशल मीडियावर भाग्यश्री प्रचंड सक्रिय असते. आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील अनेक घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतच भाग्यश्रीने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. आणि या व्हिडिओमध्ये भाग्यश्री चक्क पोल डांस (Pole Dance) करताना दिसत आहे. ‘परम सुंदरी’ या हिट गाण्यावर भाग्यश्री आपल्या मैत्रिणीसोबत पोल डान्सची मजा लुटत आहे. (Video: Actress Bhagyashree’s doing amazing pole dance video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyashree (@bhagyashree.online)

- Advertisement -

भाग्यश्रीचा हा बिंदास्त अंदाज पाहून चाहते देखील खूश झाले आहेत. तसेच या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. भाग्यश्रीने तिच्या एका फ्रेंडला वाढदिवसा निमीत्त स्पेशल व्हिडिओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर भाग्यश्रीच्या या डांस व्हिडिओची भारीच चर्चा रंगत आहे. भाग्यश्रीच्या वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास भाग्यश्री कंगना रनौतच्या ‘थलायवी’ या आगामी सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.


हे हि वाचा – रानू मंडलच्या आवाजात ‘बचपन का प्यार’ गाणं ऐकलं का? पाहा व्हायरल व्हिडिओ

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -