करिनाने सोडलेला बोल्ड चित्रपट आता कंगना करणार

करिनाने सोडलेला बोल्ड चित्रपट आता कंगना करणार

बॉलिवूड क्षेत्रातील शानदार कंगना रणौत आणि राजकुमार राव लवकरच मेंटल है क्या या चित्रपटात एकत्र पहायला मिळणार आहे. चित्रपटातील पोस्टर समोर आल्यापासून चर्चा होताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याची तारिख निश्चित नसल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर दिनांक रिवील करण्यात आली आहे. हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटात यापुर्वी अभिनेत्री करिना कपूरला कास्ट करण्यात येणार होते.

बोल्ड लूकमध्ये कंगणा

या चित्रपटाचे पोस्टर भयानक आहे. या पोस्टरमध्ये कंगना सोबत राजकुमार दिसत असून त्या दोघांनी आपल्या जीभेत ब्लेड धरताना दिसत आहे. पहिले हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार होता. परंतु, कंगनाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ही तारिख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटात प्रथमच कंगना रणौत आणि राजकुमार राव सोबत काम करताना दिसणार आहे. यामध्ये कंगनाचा लूक बोल्ड असेल अशी चर्चा दिसत आहे.

चित्रपटासाठी करिना पहिली निवड

चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती ही करिना कपूरला देण्यात आली होती. या चित्रपटाचा आशय आणि कथा अतिशय बोल्ड असल्याने करिनाने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाची ऑफर कंगनाला देण्यात आली कंगना चित्रपटाची स्किप्ट आवडल्याने या चित्रपटात कंगना प्रेक्षकांना दिसणार आहे.

First Published on: April 17, 2019 2:56 PM
Exit mobile version