संसद परिसरात ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी कंगनाने मागितली परवानगी

संसद परिसरात ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी कंगनाने मागितली परवानगी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सतत तिच्या प्रोफेशनल किंवा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या इंदिरा गांधी यांच्यावरील आधारित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून याचं चित्रपटाच्या शूटिंगसाठी कंगनाला संसद परिसरात शूटिंग करण्याची परवानगी हवी आहे. यासाठी कंगनाने लोकसभा सचिवालयाकडे परवानगी मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाच्या या मागणीवर विचार सुरु आहे परंतु तिला परवानगी न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असं म्हटलं जातंय की, लोकसभा सचिवालयाला लिहिलेल्या पत्रामध्ये कंगनाने संसद परिसरात चित्रपटातील काही सीन्स शूट करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु अनेकदा प्रायवेट इंस्टीट्यूशंसला संसद परिसरात शूटिंग करण्याची परवाणगी दिली जात नाही. परंतु सरकारी प्रसारक, दूरदर्शन आणि संसद टी.व्हीला संसदेच्या आत शूटींग करण्याची परवाणगी दिली जाते. परंतु प्रायवेट इंस्टीट्यूशंसला अशा प्रकारची परवाणगी दिली जात नाही.

‘इमर्जन्सी’मध्ये कंगना साकारणार इंदिरा गांधींची भूमिका
‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती, लेखन कंगना रनौत करणार असून चित्रपटातील इंदिरा गांधींची मुख्य भूमिका कंगनाच साकारणार आहे. या चित्रपटात 1975 मध्ये झालेल्या आपतकाळ दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना कंगना म्हणाली होती की, “आणीबाणी हा भारतीय राजकीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, ज्याने आपला सत्तेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि म्हणूनच मी ही कथा सांगण्यास जास्त उत्सुक आहे.” कंगना या चित्रपटानंतर ‘चंद्रमुखी 2’मध्येसुद्धा झळकणार आहे.’

 


हेही वाचा :

अरबाज खान म्हणाला… मला परत एकदा मलायकासोबत लग्न करायचंय?

First Published on: December 19, 2022 12:29 PM
Exit mobile version