शिवसेना नेत्यांमुळे जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलमध्ये हलवा- कंगना रानौत

शिवसेना नेत्यांमुळे जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलमध्ये हलवा- कंगना रानौत

Kangana Ranaut Controversy: स्वातंत्र्याबाबत कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य, पद्मश्री काढून घेण्याची राजकीय पक्षांची मागणी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंदेलविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मुंबईत तीन खटले सुरु आहेत. परंतु हे तीनही खटले हिमाचल प्रदेशात वर्ग करण्याच्या मागणीसाठी कंगनाने सुप्रीम कोर्टात याचिका (Supreme Court ) दाखल केली आहे. कंगना आणि तिची बहिण रंगोलीने तिन्ही खटले मुंबई आणि महाराष्ट्रातून हिमाचल प्रदेशला ट्रान्सफर करण्याची मागणी या याचिकेत केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात आपल्याला शिवसेना (Shivsena) नेत्यांकडून धोका आहे. जर मुंबईत या खटल्यांची सुनावणी झाली तर शिवसेना नेते आपला रोष व्यक्त करण्यासाठी टोकाची पावले उचलू शकतात असं मत कंगनाने या याचिकेत मांडले आहे. शिवसेनेच्या भितीमुळेच सर्व खटले शिमला कोर्टात वर्ग करण्याची मागणी केल्याचं कंगनाने आपल्या याचिकेमध्ये नमूद केलं आहे. कंगना आणि तिची बहिणीने वकील नीरज शेखर यांच्याद्वारे सुप्रिम कोर्टा स्थानांतरण याचिका दाखल केली आहे.

मुंबईत कंगनाविरोधात वकील अली कासिफ यांनी पहिला खटला दाखल केला, त्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी मानहानीचा दुसरा खटला दाखल केला. तर तिसरा खटला कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना आणि तिची बहिण रंगोलीविरोधात दाखल केला आहे. हे तीन खटले हिमाचल प्रदेशात वर्ग करण्याची मागणी कंगनाने केली आहे.
ह्रतिक रोशन प्रकरणासंदर्भात गीतकार जावेद अख्तर यांच्यावर कंगनाने एका मुलाखतील आक्षेपार्ह विधान केलं होते. यावेळी जावेद अख्तर यांनी कंगनावरच मानहानीची तक्रार दाखल केली होती. अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांनी याबाबत कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट देखील जारी केलं होतं. त्यासोबतच कंगना रानौतनं कृषी कायद्यावरुन आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळेही वादात सापडली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने तिच्यावर कर्नाटकातही FIR दाखल करण्यात आला होता.


हेही वाचा- कार्तिकचा ‘धमाका’ चित्रपटाचा टिझर झाला प्रदर्शित

 

First Published on: March 2, 2021 7:18 PM
Exit mobile version