कंगना रनौत घेणार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

कंगना रनौत घेणार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

कंगना राणौत (सौजन्य - न्यूजफॉलो)

अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेतील संघर्ष शिगेला पेटला असताना आता ती थेट राज्याच्या राज्यपालांकडे धाव घेत आहे. कंगना रनौत उद्या, रविवार १३ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर सायंकाळी साडेचार वाजता भेट घेणार आहेत. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शाब्दिक युद्ध सुरू आहे.

कंगनाने सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनेक विधाने केली असून एका विधानात तिने मुंबई पोलिसांबाबत अविश्वास दर्शवणारे वक्तव्य केले होते. त्यानंतरपासूनच संजय राऊत यांनी कंगनावर टीका करण्यास सुरूवात केली. तसेच मुंबई महापालिकेनेही तिच्या वांद्रे येथील कार्यालयातवर अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत कारवाई केली. त्यामुळे कंगना व्यथित झाली असून आता ती थेट राज्यपालांची भेट घेणार असल्याचे समजते.

दरम्यान, शिवसेनेसोबतचा संघर्ष सुरू असताना कंगनाने मराठीतील एक ट्विट शेअर केले आहे. तिने म्हटले आहे की, ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन’. या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कंगनाच्या हाती तलवार देतानाचा हा फोटो आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी तिला हा फोटो पाठवल्याचे कंगनाने ट्विटमध्ये सांगितले. ‘अनेक मीम्स मला मिळाले. हा एक फोटो मला माझे मित्र विवेक अग्निहोत्री यांनी पाठवला. हा फोटो पाहून मी भावूक झाले. राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. जय हिंद जय महाराष्ट्र’, असे तिने मराठीत लिहिले.

हेही वाचा –

KEM Chaos : गुन्हेगाराला अटक न केल्यास संप पुकारणार; डॉक्टरांचा इशारा

First Published on: September 12, 2020 8:17 PM
Exit mobile version