बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी नवा पाहुणा आला आहे. ज्याची सध्या जास्त चर्चा होत आहे. कंगनाची बहिणी रंगोली चंदेल हिच्या वाढदिवसानिमित्ताने कंगनाच्या घरी हा नवा पाहुणा आला आहे. हा नवा पाहुणा कंगनाने आपल्या बहिणीला वाढदिवसा निमित्ताने खास गिफ्ट म्हणून दिला आहे. या गिफ्टचा फोटो कंगनाने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केला आहे. कंगनाने बहिणीला दिलेले वाढदिवसाचे गिफ्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. रंगोली चंदेलला कंगनाने एक छोटासा क्युट कुत्रा गिफ्ट म्हणून दिला आहे.
आज (बुधवार) सकाळी कंगनाने आपल्या चाहत्यांसाठी या खास गिफ्टचा फोटो शेअर केला. या कंगनाच्या खास गिफ्टमुळे रंगोली चंदेल खूप आनंदी दिसत आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रंगोलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. कंगना म्हणाली की, ‘माझ्या एकुलत्या एक बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सध्या रंगोली खूप खुश आणि चुलबुली असते. परंतु ती एक आई आहे, हे मला माहित आहे. म्हणून आमच्या कुटुंबात अजून एक पाहुणा आला आहे. मित्रांनो, या गप्पू चंदेलला भेटा.
हेही वाचा – राहुल रॉय ICU मधून बाहेर, घेतायत स्पीच थेरपी