अगाऊपणा नडला कपिल शर्माचा सीन ‘गदर’ सिनेमातून केला कट

अगाऊपणा नडला कपिल शर्माचा सीन ‘गदर’ सिनेमातून केला कट

अगाऊपणा नडला कपिल शर्माचा सीन गदर म्हणून कट केला

बॉलिवूडमध्ये तसेच छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने तसेच कॉमेडीने लोकांचे मनोरंजन करणारा कपिल शर्माने 2001 साली  अभिनेता सनी देओल (Sunny Deol) तसेच अमीषा पटेल (Ameesha Patel)यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘गदर’ सिनेमात काम केलं होतं. अशी महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे. पण चित्रिकरणा दरम्यान कपिलच्या काही अगाऊपणामुळे सिनेमातून त्याचा सिन कट करण्यात आला. या घटनेचा खुलासा स्वत: कपिल शर्मा याने त्याच्या कॉमिडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये केला होता. यावेळेस अभिनेता सनी देओल कपिलच्या सेटवर एका एपिसोडच्या शुटींगकरीता पोहोचला असता.  संवादा दरम्यान कपिलने त्याने ‘गदर ‘सिनेमात काम केलं असल्याचे सांगितलं होत.

कपिल यानंतर खूप खुश झाला होता. त्याला वाटले की तो सुद्धा आता सिनेमात झळकणार आहे. सिनेमा रिलीज होताच कपिलने सिनेमा पाहिला तेव्हा त्याने केलेल्या शुटींगचा भाग काढून टाकण्यात आला आहे असे त्याच्या निदर्शनास आले. हि संपुर्ण घटना ऐकूण अभिनेता सनी देओल आश्चर्यचकीत झाले होते.



हे हि वाचा – दिपिकाच्या वस्तू का ढापतोस? स्लिंग बॅगवरून रणवीर सिंह ट्रोल



 

First Published on: July 8, 2021 5:41 PM
Exit mobile version