भाषा नव्हे, तर चित्रपटाची ताकद पाहिली; बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर करण जोहरचं स्पष्ट मत

भाषा नव्हे, तर चित्रपटाची ताकद पाहिली; बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर करण जोहरचं स्पष्ट मत

निर्माता दिग्दर्शक करण जोहर

मागच्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यातले काही चित्रपट फ्लॉप ठरले तर काही हिट झाले होते. तर काही बॉलिवूडमधले बिग बजेट चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. बॉलिवूडमधला प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याचा ‘जुग जुग जियो’ (Jug jugg Jeeyo) हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच संपन्न झाला आणि सोशल मीडियावर त्याची चर्चासुद्धा रंगली आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी (kiara advani) आणि वरुण धवन (varun dhawan) यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यादरम्यान बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर करण जोहरने स्वतःचं स्पष्ट मत मांडलं आहे.

मागच्या काही दिवसांत बॉलिवूड चित्रपटसृष्टी विरुद्ध साऊथ चित्रपट सृष्टी, असा वादंग निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या अनेक कलाकारांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यातील काही म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (mahesh babu) याने सुद्धा बॉलिवूडबद्दल चुकीचं विधान केलं होतं, त्यापाठोपाठ अभिनेता किचा सुदीप (kichha sudip) सुद्धा या वादात आला होता. दरम्यान या सगळ्या वादावर बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर यानेसुद्धा आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. कारण त्याच्या आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’ (Jug jugg Jeeyo) या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यावेळी त्याला प्रश्न विचारले असता म्हणाला, की ‘हिंदी चित्रपटांमध्ये आणि साऊथ चित्रपटांमध्ये कोणत्याच प्रकारची स्पर्धा नाही. ‘बाहुबली’ (bahubali) चित्रपटाची ज्यांनी निर्मिती केली त्या निर्मितीमध्ये माझाही सहभाग होता. त्यावेळी मी भाषा नाही तर चित्रपटाची ताकद पहिली आणि त्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे कोणत्याच प्रकारची स्पर्धा नाही, आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे.’

या सोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे ‘जुग जुग जियो’ (Jug jugg Jeeyo) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी ‘हिंदी चित्रपटाचा ट्रेलर’ या शब्दांवर करणने अधिक भर दिला. त्याबद्दल सुद्धा करणला विचारण्यात आलं त्यावर तो म्हणाला, ‘आरआरआर, पुष्पा, केजीएफ’ हे चित्रपट हिंदीतसुद्धा डब झाले आणि त्यांनीही बॉक्स ऑफिसवर उत्तम गल्ला जमवला आहे. या चित्रपटांमुळे भारतीय चित्रपट सृष्टीची मान अधिक उंचावली आहे. प्रशांत निल आणि राजामौली सरांनी जगभरात भारतीय चित्रपटांचं स्थान मजबूत केले आहे. मागच्या काही दिवसात प्रदर्शित झालेला गंगुबाई आणि भूल भुलैय्या 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. अशा स्पष्ट शब्दांमध्ये दिग्दर्शक करण जोहर(karan johar) याने बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर आपलं मत मांडलं आहे. दरम्यान कारण जोहरचा ‘जुग जुग जियो’ (Jug jugg Jeeyo)हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

First Published on: May 23, 2022 2:37 PM
Exit mobile version