…आणि म्हणून करिना कपूर तैमूरसह आली नाशिकला

…आणि म्हणून करिना कपूर तैमूरसह आली नाशिकला

तैमुरसोबत करिना, करिष्मा, त्यांची आई बबिता हे कुटुंब नाशिकमध्ये विशेष विमानाने दाखल झाले.

हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका बेबो उर्फ करिना कपूर खान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर दिसून आली. खान कुटुंबातील बहुचर्चित अपत्य तैमूरसह बहिण करिष्मा व आई बबिता ही करिना सोबत आहे. हे कुटुंब मुंबईहून विशेष विमानाने शनिवारी विमानतळावर उतरले. येथील त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी ते आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दर्शनानंतर दुपारी साडेतीनच्या विमानाने ते अहमदाबादला जाणार आहेत. हे कुटूंब नाशिक विमानतळावर येत असल्याची माहिती सुरक्षिततेच्या दृष्टीने गोपनीय ठेवण्यात आली. सध्या करिष्मा आणि करिना फारशा चित्रपटात झळकत नसले तरीही हे कुटूंब नेहमीच चर्चेत असते.

तैमुरच्या जन्मानंतर तर माध्यमांमध्ये त्याचे फोटो व्हायरल करण्यासाठी स्पर्धाच लागली होती. विशेष म्हणजे माध्यमांच्या नजरेत तैमूर फारसा येणार नाही याची काळजी करिना कपूर-खान घेत असते. परंतु ओझर येथील विमानतळावर आल्यावर त्यांनी काढलेला संपूर्ण कुटूंबाचा फोटो व्हायरल झाला. दरम्यान बबीता कपूर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व कुटुंब नाशिकला सुटीवर आल्याचेही सांगितले जात आहे.

First Published on: April 20, 2019 1:14 PM
Exit mobile version