HBD- वयाच्या 15 व्या वर्षी करीना पडली होती प्रेमात, आईला कळताच केलं बोर्डींगमध्ये दाखल !

HBD- वयाच्या 15 व्या वर्षी करीना पडली होती प्रेमात, आईला कळताच केलं बोर्डींगमध्ये दाखल !

HBD- वयाच्या 15 व्या वर्षी करीना पडली होती प्रेमात, आईला कळताच केलं बोर्डींगमध्ये दाखल !

बॉलिवूडची(bollywood) बेबो करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan) गेल्या दोन दशकापासून सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवत आहे. करीनाने अभिनयासह आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देत आपला खास ट्रेंन्ड सेट केला आहे. आज करीनासाठी स्पेशल दिवस आहे. करीना आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमीत्त करीनाच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

आज जरी करीना तिच्या प्रोशेनल लाईफ बद्दल विशेष ओळखली जात असली तरी लहापणी करीना कपूर खुपच मस्तीखोर होती. करीना शाळेमध्ये तसेच घरी फार दंगा करत असे. यामुळे अनेकदा तिची आई तिला शिक्षा देखील द्यायची. मात्र करीनाने एके दिवशी अशी चूकी केली की तिच्या आईने तिला बोर्डींग स्कूलमध्ये पाठवून दिले. हा मजेशीर किस्सा करीनाने एका मुलाखती दरम्यान सांगितला होता.

वयाच्या 15 व्या वर्षी करीनाला एक मुलगा पसंत पडला होता. करीना नेहमी त्या मुलाला भेटण्यासाठी घरच्यांपासून लपत -छपत जात असे. मात्र काही दिवसानंतर करीनाच्या आईला सर्व हकीकत काळाली. यानंतर त्यांनी करीनाचा फोन एका खोलीमध्ये बंद करुन ठेवला. तसेच करीना आपल्या मित्रांसह त्या मुलाल भेटू लागली. आई घराबाहेर जाताच करीना सुरीने दरवाजावरील टाळा उघडून बाहेर पडत असे. आणि मित्रांसह मिळून त्याला भेटण्याचा प्लॅन करायची. मात्र यानंतर करीनाच्या आईला खूपच राग आला. करीनाच्या वाढत्या प्रतापानंतर तिला देहरादून मधील एका बोर्डींग शाळेत दाखल केलं होतं.

बॉलिवूडमधील अनेक टॉप अभिनेत्रीच्या यादीत करीनाची गणना करण्यात येते. अनेक नव अभिनेत्री करीनाला प्रेरणास्थान मानतात तसेच तिचा आदर करतात.


हे हि वाचा – वादळानंतर सुंदर गोष्टी घडतात…राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पाची भावनिक पोस्ट व्हायरल

First Published on: September 21, 2021 11:58 AM
Exit mobile version