करिश्मा कपूरने दिला चाहत्यांना सकारात्मक राहण्याचा संदेश

करिश्मा कपूरने दिला चाहत्यांना सकारात्मक राहण्याचा संदेश

करिश्मा कपूरने दिला चाहत्यांना सकारात्मक राहण्याचा संदेश

कोरोनाचे संकट देशात आजही कायम आहे. अश्या गंभीर परिस्थितीत लोकांची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. लोकांवर फक्त आर्थिक भारच नाही तर मानसिक तान देखील वाढू लागला आहे. अशा वेळेस पोष्टिक आहारा सोबतच मानसिक आरोग्य उत्तम राखणे देखिल तितकेच महत्वाचे आहे. अनेकदा लोकांवर त्यांच्या आवडत्या व्यक्तीचा किंवा कलाकारांचा लवकर प्रभाव पडतो. आणि ही बाब लक्षात घेता अनेक सेलिब्रिटी त्यांचा सोशल मीडिया अकाऊंटचा वापर लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याकरिता करत आहेत. नुकतच अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सोशल मीडियावर एक मोटीवेशनल पोस्ट करत आपल्या चाहत्यांना सकारात्मक रहण्याची अशा बाळगा असा संदेश दिला आहे. “प्रत्येक दिवस हा काही चांगलं काम करून दखवण्याची तसेच चांगल्या वेळेची संधी देत असतो. सकारात्मक राहा #आनंद निवडा.” असं पोस्ट करत लोकांना आवाहन केलं आहे.

कोरोनाच्या काळात अनेक कलाकार कोट्यवधी रुपयांची मदत करण्यासोबतच जनजागृती करण्याचे काम देखील करत आहेत.करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास करिश्मा गेले अनेक दिवसांपासून रूपेरी  पडद्यापासून दूर आहे. तसेच गेल्या वेळेस करिश्मा ‘मेंटलहुड’ या वेब सिरिज मध्ये दिसली होती. शाहरुख खानच्या ‘झीरो’ या सिनेमात करिश्माने कॅमियो केला होता.


हे हि वाचा – ‘ख्वाबों के परिंदे’ मधून उलघडणार जीवाभावाच्या मैत्रीचे पैलू

First Published on: June 2, 2021 6:08 PM
Exit mobile version