कार्तिक आणि साराचा रोन्मास पाहून कार्तिकच्या आईची ‘ही’ रिक्शन

कार्तिक आणि साराचा रोन्मास पाहून कार्तिकच्या आईची ‘ही’ रिक्शन

कार्तिक आणि साराचा रोन्मास पाहून कार्तिकच्या आईची 'ही' रिक्शन

लवकरच बॉलिवूडचा चॉकेलट बॉय कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘लव आजकल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच या चित्रपटातील ‘शायद’ हे गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या गाण्यात कार्तिक आर्यन सारा अली खान आणि आरुषी शर्मा यांच्यासोबत रोमान्स करताना दिसतं आहे. या गाण्यातील कार्तिकने केलेल्या रोमान्स पाहण्यात कार्तिकची आई हरवून गेली आहे.

कार्तिकची आई ‘शायद’ हे गाणं पाहतानाचा व्हिडिओ कार्तिकने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओ स्टोरीमध्ये कार्तिक आर्यनची आई ‘शायद’ हे गाणं पाहताना रमली असल्याचं दिसतं आहे. कार्तिक आर्यनच्या आई व्यतिरिक्त सारा अली खान आणि कार्तिकच्या चाहत्यांनी देखील या गाण्यावर तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. अरिजीत सिंगने ‘शायद’ हे गाणं गायलं असून युट्यूबवर हे गाणं ट्रेंडिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सारा आणि कार्तिकच्या केमेस्ट्रीने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सारा आणि कार्तिकचा हा चित्रपट १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिक व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली याने केलं आहे. सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणचा ‘लव आजकल’ या चित्रपटाचा सिक्वल आहे.


हेही वाचा – कंगनाचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य म्हणाली, अशा महिलांच्या पोटी बलात्कारी जन्मतात


 

First Published on: January 23, 2020 10:47 PM
Exit mobile version