‘या’ मराठी दिग्दर्शकाच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात दिसणार कार्तिक आर्यन

‘या’ मराठी दिग्दर्शकाच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात दिसणार कार्तिक आर्यन

'या' मराठी दिग्दर्शकाच्या 'सत्यनारायण की कथा' चित्रपटात दिसणार कार्तिक आर्यन

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनबाबत आपण अनेक निगेटिव्ह बातम्या पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. पण आता कार्तिक आर्यनाच्या चाहत्यांसाठी एक पॉझिटिव्ह बातमी आहे. कार्तिकच्या नवा प्रोजेक्टची घोषणा झाली आहे. कार्तिक एका नव्या आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ‘सत्यनारायण की कथा’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे दिग्दर्शकांची धुरा समीर विद्वांसने सांभाळली आहे. कार्तिक आर्यनने स्वतः सोशल मीडियावरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. कार्तिकच्या या नव्या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे.

कार्तिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘सत्यनारायण की कथा’चा छोटासा व्हिडिओ पोस्ट करून चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मेरे दिल के करीब एक कहानी’ असे कार्तिक पोस्ट करताना कॅप्शन लिहिले आहे.

 

तसेच निर्माता साजिद नाडियाडवालाने देखील ट्विट करत सांगितले आहे की, कार्तिक आर्यनला महाकाव्य प्रेम-कथा ‘सत्यनारायण की कथा’मध्ये सत्यच्या रुपात पाहू शकता. पहिली झलक लाँच केला असून हे खूप रोमांचक आहे.

याबाबत कार्तिक आर्यन म्हणाला की, ‘मी बऱ्याच काळापासून साजिद सरांसोबत काम करण्यासाठी इच्छूक होतो. मी खूप आनंदी आहे, कारण मी साजिद सर, शारीन आणि किशोर यांच्या व्हिजन एक भाग आहे. ‘सत्यनारायण की कथा’ एक संगीतमय प्रेम कथा आहे. जे संवेदनशील विषयांना अत्यंत मनोरंजन बनवण्याची सूक्ष्म जाण असलेल्या समीर विद्वांस सरांसोबत ही माझी पहिली वेळ आहे.’

दरम्यान कार्तिक आर्यनला करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मधून बाहेर काढले असून आता त्याच्या जागी अक्षय कुमार दिसणार आहे. या व्यतिरिक्त कार्तिक ‘भूल भुलैया २’ आणि ‘धमाका’ चित्रपटात दिसणार आहे.

 

First Published on: June 23, 2021 1:37 PM
Exit mobile version