दोस्ताना २ मधून कार्तिक आर्यन ड्रॉप, अभिनेत्री पूजा बेदी कार्तिकची बाजू घेत म्हणाली नेपोटिजम…

दोस्ताना २ मधून कार्तिक आर्यन ड्रॉप, अभिनेत्री पूजा बेदी कार्तिकची बाजू घेत म्हणाली नेपोटिजम…

दोस्ताना २ मधून कार्तिक आर्यन ड्रॉप, अभिनेत्री पूजा बेदी कार्तिकची बाजू घेत म्हणाली नेपोटिजम...

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Jahnavi Kapoor) यांचा ‘दोस्ताना २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. निर्माता करण जौहरने (Karan Johar) दोघांना लीड रोलसाठी साईन केले होते. मात्र अचानक करण जौरहने कार्तिक आर्यनला सिनेमातून बाहेर काढले. त्यानंतर मात्र करण जौहरला सोशल मीडियावर चांगलेत ट्रोल करण्यात आले. कार्तिक आर्यनला सिनेमातून ड्रॉप केल्यानंतर करण जौहरचा नोपोटिजम पुन्हा चर्चे आला. आता या प्रकरणात अभिनेत्री पूजा बेदीने कार्तिकची बाजू घेत नेपोटिजम वरुन सुनावले आहे. कोणतीही बॅकग्राउंड नसलेले आउटसाइट कलाकारांना अशाप्रकारे पुढे जाण्यापासून रोखण्यात येते आता कार्तिक आर्यनच्या बाबतीत झालेला प्रकारातून हे दिसून येत आहे,असे पूजा बेदीने म्हटले आहे.

इथे सर्वांना समान संधी आहे. त्यांनी सांगितल्यामुळे मलाही मसाबा मसाबासाठी ऑडिशन द्यावे लागले होते. ज्यांचेकडे विशेष अधिकार असताता लोक त्यांचाच हेवा करतात. जर एखाद्या अभिनेत्याच्या मुलाला त्याच क्षेत्रात काम करायचे असेल तर त्याच्यावर नेपोटिजमचा आरोप लावणे चुकीचे आहे.

आपल्याकडे असे बरेच सेलिब्रेटी आहेत ज्यांनी स्वत: हून या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रिती झिंटा, ऐश्वर्या रॉय,शाहरुख खान,माधुरी दिक्षित,सुष्मिता सेन ही त्याच्यापैकी काही नावे आहेत. यांना कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना ते इंडस्ट्रीमध्ये आले आणि आता दुसऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत जे या क्षेत्रात आले परंतु त्यांना योग्य कामे आणि स्थान मिळू शकले नाही,असे पूजा बेदी म्हणाली.

दोस्ताना २ सिनेमाचे बरेचसे शुटींग झाले आहे. त्यामुळे धर्मा प्रॉडक्शन पुन्हा एकदा कार्तिक आर्यनला सिनेमात रिप्लेस करणार आहे, असे म्हटले जात आहे. सिनेमाला दीढ वर्ष झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या स्क्रिप्टमध्ये बदल करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – ‘मिशन: इम्पॉसिबल’च्या सेटवर घुसखोरांचा हल्लाबोल,टॉम क्रूझने केला कडक पोलीस बंदोबस्त

 

First Published on: May 10, 2021 2:09 PM
Exit mobile version