पायाला दुखापत होऊनही बिग बी करतायत KBC 13 शूटिंग, फोटो झाला व्हायरल

पायाला दुखापत होऊनही बिग बी करतायत KBC 13 शूटिंग, फोटो झाला व्हायरल

पायाला दुखापत होऊनही बिग बी करतायत KBC 13 शूटिंग, फोटो झाला व्हायरल

बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन क्विज शो ‘कौन बनैगा करोडपती’ (KBC) होस्ट करत आहेत. त्यांचा हा शो आणि त्यामधील किस्से नेहमीच चर्चेत असतात. आता अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत होऊनही केबीसी १३ (KBC 13) शूटिंग करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः सांगितले आहे. आपल्या पायाला झालेली जखम कसे लपवत आहेत, हे त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘त्यांच्या पायाच्या बोटाला जखम झाली असून त्यांना खूप वेदना होत आहेत. ही जखम ठिक होण्यासाठी चार ते पाच आठवडे लागतील.’ अशा परिस्थिती अमिताभ बच्चन आपल्या वेदना आणि जखम लपवत शूटिंग करत आहेत. केबीसी १३च्या नवरात्री स्पेशल एपिसोडच्या शूटिंगसाठी अमिताभ यांनी ट्रेडिशनल अवतार केला असून त्यांना याचा फोटो शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी फोटोज शेअर करत लिहिले की, ‘आपले जखम झालेले बोट लपवण्यासाठी कॅमोफ्लाज शूज घातले आहे. मोज्या सारखे आहे, परंतु शूज नाही आहेत. माझ्या जखम झालेल्या बोटासाठी सॉफ्ट प्रोटेक्शन आहे.’

शुक्रवारी केबीसी १३मध्ये अभिनेता प्रतीक गांधी आणि पंकज त्रिपाठी उपस्थिती राहिले. यावेळेस दोन्ही स्टार्ससोबत अमिताभ बच्चन मस्ती करताना दिसले. दरम्यान येत्या काळात अमिताभ बच्चन ‘ब्रह्मास्त्र’, ‘गुडबाय’, ‘प्रोजेक्ट के’, ‘मेडे’, ‘झुंड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.


हेही वाचा – चित्रपटांच्या रिलीज डेटच्या मुद्द्यावर कंगना म्हणते… ‘Dumb Bollywoodias’


First Published on: October 1, 2021 5:07 PM
Exit mobile version