केदार – भरतची जोडी नव्या मालिकेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

केदार – भरतची जोडी नव्या मालिकेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

दिग्दर्शक, लेखक, निर्माता केदार शिंदे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवीकोरी फ्रेश मालिका घेऊन येत आहेत. मराठी चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये हिट ठरलेली ही केदार शिंदे आणि अभिनेता भरत जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. छोट्या पडद्यावर अभिनेता भरत जाधव यांची सुखी माणसाचा सदरा ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळार आहे. कलर्स मराठी चॅनेलवर येत्या २५ ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही मालिका सुरू होणार असल्याची माहिती स्वतः केदार शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. तसेच त्यांनी मालिकेची एक झलकही व्हिडिओच्या स्वरूपात दाखवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून केदार शिंदे सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी नवीन घेऊन येतोय, हे प्रेक्षकांना सांगत होते. यावेळी त्यानी जुन्या काळातील गोष्टींचा उल्लेख आपल्या ट्विटर पोस्टमध्ये केला आहे. त्यात जुन्या काळातील टीव्ही, सायकल, लोणचं, क्रिकेट बॅट, आराम खुर्ची या सामनांचा फोटोही त्यांनी शेअर केले. आता मालिकेच्या शिर्षकावरून आयुष्यात प्रत्येक गोष्टीत सुख पाहणारा माणूस असे कथानक असल्याची शक्यता आहे. तरीही केदार शिंदे कशा पद्धतीने ते प्रेक्षकांसमोर मांडणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्या दिग्दर्शक – कलाकार जोडीने अनेक सुपरहिट नाटके, मालिका, चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. या दोघांच्या कलाकृतीचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे आता ही जोडी काय कमाल दाखवणार हे नव्या मालिकेतून दिसणार आहे.

हेही वाचा –

World Coffee Day : कधीही कुठेही प्या; निवडा तुमची फेव्हरिट कॉफी!

First Published on: October 1, 2020 11:47 AM
Exit mobile version