घरलाईफस्टाईलWorld Coffee Day : कधीही कुठेही प्या; निवडा तुमची फेव्हरिट कॉफी!

World Coffee Day : कधीही कुठेही प्या; निवडा तुमची फेव्हरिट कॉफी!

Subscribe

कॉफीचा एक सिप आणि तुमचा मूड एकदम फ्रेश होतो. उत्तेजक पेयांमध्ये चहाइतकीच पसंती कॉफीलाही आहे. किंबहुना कॉफी लव्हर्सचे प्रमाण जरा जास्तच आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज, १ ऑक्टोबर रोजी जागतिक कॉफी दिन असून त्या निमित्ताने जगभराता विविध प्रकारच्या मिळणाऱ्या कॉफीचे प्रकार आपण जाणून घेणार आहोत. काळी कॉफी, दुधाची कॉफी, स्ट्राँग, माईल्ड, विथ आऊट शुगर, विथ ब्राऊन शुगर, फक्त दुधाची कॉफी अशा कॉफीच्या कितीतरी तऱ्हा आहेत. यातली तुमची नेमकी आवडती कॉफी कोणती? सांगू शकाल. जाणून घ्या कॉफीचे विविध प्रकार…

  • कॅपोचिनो – जगभरात कोणत्याही कॉफी शॉपमध्ये कॅपेचिनो हा प्रकार हमखास मिळतो. या कॉफी प्रकारात एस्प्रेसोमध्ये दुध मिसळल जातं. सोबतच चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट पावडरने वरून सजावट केली जाते.

- Advertisement -
  • एस्प्रेसो – याला ब्लॅक कॉफीही म्हटलं जातं. हा कॉफीचा महत्त्वाचा घटक आहे. देशभरात जितके कॉफी प्रकार आहेत ते या मिश्रणात बनवूनच तयार होतात. ही स्ट्राँग कॉफी जगभरात प्रसिद्ध आहे. पाणी उकळून त्यात एस्प्रेसो पावडर मिसळून आवडीनुसार साखर टाकून ही कॉफी बनवली जाते.

  • मोचा चिनो – कॅपेचिनो कॉफीमध्ये कोको पावडर मिसळून मोचा चिनो कॉफी बनवली जाते. या कॉफीमध्ये गार्निशिंगसाठी व्हीप्ड क्रीमचा वापर केला जातो.

- Advertisement -
  • आयरिश कॉफी – आयरिश कॉफी ही सर्वाधिक लोकप्रिय कॉफी प्रकारांपैकी एक आहे. ही कॉफी बनवण्यासाठी व्हिस्की, एस्प्रेसो आणि साखरेचा वापर करतात.

  • एस्प्रेसो मॅक्कीआटो – एस्प्रेसो कॉफीच्या या प्रकारात उकळलेलं दुध टाकलं जातं. हा एस्प्रेसोचाच एक प्रकार आहे. फक्त दुध मिसळ्यामुळे त्याच्या चवीत बदल होतो. डार्क कॉफी पिणारे एस्प्रेसो मॅक्कीआटोची निवड करतात.

  • इंडियन फिल्टर कॉफी – दक्षिण भारतात फिल्टर कॉफीची निर्मिती झाल्याचे समजते. कॉफीच्या सुकलेल्या बियांपासून ही बनवली जाते. यामध्ये दुध आणि साखरही मिसळतात. इतरांपेक्षा ही कॉफी जास्त गोड असते.

हेही वाचा –

देशात कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाख पार; आतापर्यंत ९८ हजार रुग्णांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -