‘Kill Bill’ हॉलिवूडपटाच्या हिंदी रीमेकमध्ये कृति सैननची वर्णी? अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन

‘Kill Bill’ हॉलिवूडपटाच्या हिंदी रीमेकमध्ये कृति सैननची वर्णी? अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन

'Kill Bill' हॉलिवूटपटाच्या हिंदी रीमेकमध्ये कृति सैननची वर्णी? अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक हॉलिवूड सिनेमाचे रीमेक बनवण्यात येत आहे. 2 वर्षीपुर्वी निखिल द्विवेदी (Nikhil Dwivedi)याने ‘क्विंटेन टॅरंटिनो’ यांचा प्रसिद्ध सिनेमा ‘किल बिल'(Kill Bill) च्या हिंदी रीमेकसाठी अधिकृतपणे हक्क विकत घेतले होते. तेव्हापासून सिनेमाची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. आता या सिनेमा बाबत महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे. किल बिन सिनेमाच्या हिंदी रिमेकचं दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap)डायरेक्ट कराणार आहे तसेच पिंकविलाच्या रिपोर्टनुसार या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री कृति सैननची(kriti sanon) वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कृति सोबत बोलणी चालू असल्याचे कळतेय. या सिनेमाच्या ओरिजनल भागात ‘उमा थरमन’ (uma thurman)या नायिकेने दमदार कामगिरी केली होती. तसेच फिल्मशी जोडलेल्या सूत्राने सांगितले आहे की लॉकडाउन दरम्यान निखिलने अनुराग कश्यप सोबत अडॉप्टेशनवर काम केलं आहे.

तसेच सिनेमात काम करण्यासाठी कृति सेननचे नाव लिस्टमध्ये समाविष्ट आहे.वर्क फ्रंट बाबतित सांगायचे झाल्यास कृति सैनन अर्जुन कपूर आणि संजय दत्त सोबत ‘पानीपत’ सिनेमात झळकली होती. तसेच कृती ‘मिमी’, ‘बच्चन पांडे’, ‘भेड़िया’, ‘आदिपुरुष’ सिनेमात दिसणार आहे. तसेच ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या शूटिंग नंतरच कृति ‘किल बिल’ च्या हिंदी रीमेकसाठी शूटींगच्या तारखा फिक्स करणार आहे.


हे हि वाचा – तारक मेहता का उल्टा चष्मा:दिव्यांका त्रिपाठीने दयाबेनची भूमिका करण्यास दिला नकार?


 

First Published on: June 23, 2021 10:15 AM
Exit mobile version