घरमनोरंजनतारक मेहता का उल्टा चष्मा:दिव्यांका त्रिपाठीने दयाबेनची भूमिका करण्यास दिला नकार?

तारक मेहता का उल्टा चष्मा:दिव्यांका त्रिपाठीने दयाबेनची भूमिका करण्यास दिला नकार?

Subscribe

तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील प्रसिद्ध भुमिका दयाबेन हे पात्र साकारण्याची ऑफर आधी दिव्यांकाला मिळाली होती.

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने प्रेक्षकांच्या मनावर आजवर राज्य केलं आहे. ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘ये है मोहोबत्तें’ या हिंदी टेलिव्हीजन सिरीयलमुळे तीला प्रसिद्धी मिळाली तसेच लोकांच्या घराघरात पोचली. नुकतच समोर आलेल्या माहितीनुसार  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रसिद्ध भूमिका दयाबेन हे पात्र साकारण्याची ऑफर आधी दिव्यांकाला मिळाली होती. कोईमोई च्या वृत्तानुसार सब टिव्हीवरिला फेमस मालिका ‘तारक मेहताका उल्टा चष्मा’ मध्ये दिंव्याकाला काम करण्याची संधी मिळली होती. पण तिने हि संधी धुडकावून लावल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताबाबत अद्याप दिव्यांकाने दुजोरा दिला नाहीये तसेच दिव्यांकाकडून काही अधिकृत माहिती समोर आली नाहिये.

- Advertisement -

सध्या या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने तिच्या अभिनयाने भूमिकेला चार चाँद लावले होते इतकेच नाही तर गेल्या काही वर्षापासून दिशा मालिकेत पुन्हा कधी येणार? असे प्रश्न करुन चाहत्यांनी शोच्या मेकर्सला भांबावून सोडले आहे.चाहत्यामध्ये दयाबेनची प्रचंड क्रेझ आहे.

वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास सध्या दिव्यांका कमलीची व्यस्त आहे. दिव्यांका कलर्स वाहीनी वरिल ‘खतरो के खिलाडी 11’ च्या शुटींगसाठी केप टाउनला रवाना झाली आहे. सोशल मीडीयालर दिव्यांकाची भली मोठी फॅन फॉलॉइंग आहे. दिव्यांकाच्या प्रत्येक फोटोवर,व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट वर्षाव करतात.

- Advertisement -

हे हि वाचा —दिशा-राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -