Corona: अभिनेता कुशल टंडन याने केली TikTok बॅन करण्याची मागणी

Corona: अभिनेता कुशल टंडन याने केली TikTok बॅन करण्याची मागणी

टीव्ही कलाकार कुशल टंडन याने टिक टॉकवर बॅन आणण्याची मागणील सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. तशा आशयाची पोस्ट त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. जगभर कोरोनाचे संकट असून हा विषाणू चीनमधून आला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे टिक टॉक वापरून आपण चीनला आणखी बिझनेस देत आहोत, याचा राग कुशलने व्यक्त केला आहे. त्यामुळे टिक टॉक बंद केल्यास चीनला भारताकडून जाणारा पैसाही बंद होईल, असे कुशलचे म्हणणे आहे.

काय आहे पोस्टमध्ये 

देशातही कोनोराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जगभरातील कामकाज या कोरोनामुळे ठप्प झाले आहे. वैद्यकीय सेवांवर ताण येत आहे. याचा एक प्रकारे राग कुशलने त्याच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. काय म्हणाला कुशल टंडन, एकीकडे संपूर्ण जग चीनच्या कारनाम्यामुळे अडचणीत आली आहे. तिथे भारतीय टिक टॉकच्या माध्यमातून त्यांना उत्पन्न मिळवून देत आहेत. रिकाम्या वेळेत सगळे टिक टॉकवर वेळ घालवत आहेत. या टिक टॉकवरच बंदी आणायला हवी. मला अभिमान आहे की, मी कधीच टिक टॉकवर नव्हतो.

हेही वाचा –

मुरादाबादमध्ये २४ तासांत ११ पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर

First Published on: April 17, 2020 3:44 PM
Exit mobile version