राणू मंडलवर लता मंगेशकर नाराज?

राणू मंडलवर लता मंगेशकर नाराज?

प्रिया प्रकाश वॉरियर, डान्सिंग अंकल अशा अनेकांना सोशलमिडीयाने एका रात्रीत स्टार बनवलं आहे. सध्या या मध्ये आणखी एका नावाची भर पडणार अस दिसतय. गेले काही दिवस सोशलमिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. बंगालमधील स्टेशनवर ‘प्यार का नगमा है’ गाणं गाणाऱ्या राणूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हीडीओ नंतर सगळ्यांनी राणू ची तुलना थेट लता मंगेशकरबरोबर केली आहे. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राणू रातोरात स्टार झाली. गायक हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. हिमेश रेशमिया एका पाठोपाठ एक गाणे रिलीज केली. पण लता मंगेशकरांची उपमा मिळालेल्या राणूवर लता मंगेशकर नाराज असल्याचं दिसतय.

लता मंगेशकरांची प्रतिक्रीया

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हमाल्या, ‘मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं झालं तर मी स्वत:ला भाग्यवान समजते. मात्र मला खात्री आहे, माझी कॉपीकरून, नक्कल करून फार काळ यश मिळत नाही. हल्ली नवीन येणारे गायक किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले, मुकेश यांची गाणी म्हणतात. त्यामुळे काही काळ ही गाणी म्हणणाऱ्या गायकांना प्रसिध्दी मिळते. पण ही प्रसिध्दी फार काळ टिकत नाही. सध्याच्या घडीला अनेक उदयोन्मुख गायिका येतात पण कोणीच लक्षात रहात नाहीत. “मला फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल ठाऊक आहेत” असंही त्या म्हणाल्या.

राणू मंडेलावर भाष्य करताना त्यांनी एक सल्लाही दिला. त्या म्हणाल्या, तुम्ही तुमची गाय शैली निर्माण करा, सगळ्या गायकांची गाणी म्हणा मात्र स्वत:च गाणं शोधा, आपली शैली तयार करा. यासाठी त्यांनी अशा भोसले यांचे उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या ” जर आशाने माझ्यापेक्षा वेगळ्या ढंगात गाणं गाण्याची जिद्द जोपासली नसती तर ती माझी सावली झाली असती. एखाद्या व्यक्तीमध्ये असलेली प्रतिभा त्या व्यक्तीला किती मोठ्या शिखरावर पोहचवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आशा आहे,” असंही लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.

लता मंगेशकरांनी दिला आर्शिवाद?

सध्या यूट्यूबवर राणू मंडेलाच्या गाण्यांबरोबर आणखी एक व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओ गायिका लता मंगेशकर राणू मंडेलाला आर्शिवाद देताना दिसत आहेत. या व्हीडीओत राणूने लता मंगेशकरांसमोर त्यांच गाणं म्हटलं आणि राणूच्या गाण्यावर खूष होऊन लता दिदींनी तिला आर्शिवाद दिला असा हा व्हीडीओचे थंबनेल आहे.
पण या व्हीडीओचा थंबनेल फेक असल्याच सिध्द झाले आहे. लता मंगेशकर आजपर्यंत कधीच राणू मंडेला यांना भेटल्या नाहीत. व्हीडीओच्या थंबनेलवरचा हा व्हीडीओ फोटोशॉप करून तयार केलेला आहे.

First Published on: September 3, 2019 7:43 PM
Exit mobile version