घरमनोरंजनVideo: हिमेश रेशमियाबरोबर राणूने रेकॉर्ड केलं पहिलं गाणं!

Video: हिमेश रेशमियाबरोबर राणूने रेकॉर्ड केलं पहिलं गाणं!

Subscribe

प्रिया प्रकाश वॉरियर, डान्सिंग अंकल अशा अनेकांना सोशलमिडीयाने एका रात्रीत स्टार बनवलं आहे. सध्या या मध्ये आणखी एका नावाची भर पडणार अस दिसतय. गेले काही दिवस सोशलमिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. बंगालमधील स्टेशनवर ‘प्यार का नगमा है’ गाणं गाणाऱ्या राणूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

त्या एका व्हीडीओने तीचं आयुष्य बदललं…

या व्हायरल झालेल्या व्हीडीओ नंतर सगळ्यांनी राणू ची तुलना थेट लता मंगेशकरबरोबर केली आहे. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राणू रातोरात स्टार झाली. रेणू ने आपलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं आहे.

- Advertisement -

राणूने आपलं पहिलं गाणं गायक, संगीतकार हिमेश रेशमियासोबत गायलं आहे. या गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतचं मुंबईत पार पडलं. या रेकॉर्डिंगचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत हिमेश रेणूकडून गाणं गाऊन घेताना दिसत आहे. राणूने ‘तेरी मेरी कहानी’ हे आपलं पहिलं वहिलं गाणं रेकॉर्ड केलं आहे.

- Advertisement -

पुन्हा एकदा लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू आपल्याला ऐकायला मिळत आहे. राणूचा पहिला व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर तीला युजरर्सने लता मंगेशकरांची उपमा दिली होती.

कोण आहे राणू मंडल

राणू मंडल पश्चिम बंगाल येथं राहते. दररोज ती स्टेशनवर गाणं गाऊन गुजराण करत होती. लता दीदींचं अवघड गाणं सहजतेने गाणाऱ्या राणूला पाहून एकानं तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि राणू अचानक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. राणूला आता मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी विचारण्यात आलं आहे. एका कार्यक्रमाच्या टीमनं तर तिचा मेकओव्हरच केला आहे. त्यामुळे तीचा लूक पुर्णपणे बदलला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -