Netflix – नोटाबंदीवर अनुराग कश्यपचा चित्रपट ‘चोक्ड’

Netflix – नोटाबंदीवर अनुराग कश्यपचा चित्रपट ‘चोक्ड’

दिग्दर्शक अनुराग कश्यप नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘चोक्ड’ असं या चित्रपटाचं नाव आहे. तो ‘नेटफ्लिक्स’ च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर प्रदरशित होणारा अनुरागचा हा दुसरा चित्रपट आहे. या आधी अनुरागची ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. ‘चोक्ड’ची कथा नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात अमृता सुभाष, उपेंद्र लिमये यांसारख्या मराठी कलाकारांची बघायला मिळत आहेत.

सैय्यामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील काम करणाऱ्या महिलेची भूमिका ती साकारत आहे. अचानक एके दिवशी तिला किचनच्या पाइपमधून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवलेल्या नोटांचं बंडल मिळतं. या पैशांमुळे तिचं आणि तिच्या कुटुंबीयांचं आयुष्य थोडंफार सुधारतं. मात्र तेव्हाच नोटाबंदीची घोषणा होते. यानंतर तिला सापडलेल्या पैशांचं काय होतं, ते पैसे कुठून येतात याची उत्सुकता हा ट्रेलर बघितल्यावर निर्माण होते.

सैय्यामी खेरने २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘मिर्झिया’ या चित्रपटात तिने अनिल कपूरच्या मुलासोबत मुख्य भूमिका साकारली होती. तर अमृता सुभाष आणि उपेंद्र लिमये ही मराठी स्टार कास्ट दिसणार आहे. या दोघांना या चित्रपटात बघणं मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.


हे ही वाचा – घटस्फोटीत महिलेवर तो करायचा बलात्कार, ‘लग्न करूयात’ म्हटल्यावर केला खून!


 

First Published on: May 21, 2020 3:06 PM
Exit mobile version