‘लवरात्री’ प्रमोशनाचा शुभारंभ ‘दंड’ भरुन

‘लवरात्री’ प्रमोशनाचा शुभारंभ ‘दंड’ भरुन

लवरात्री सिनेमातील कलाकार सलमान खानसोबत (फोटो- एल्फा वर्ल्ड)

सलमान खान प्रोडक्शनचा ‘लवरात्री’ हा सिनेमा येत्या ५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमातून सलमान, आयुष शर्मा आणि वरिना हुसेनला लॉन्च करणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही नवी कोरी जोडी गुजरातला गेली आहे. पण या प्रमोशनची सुरुवातच दंडाने झाली आहे. गुजरातमध्ये प्रमोशनदरम्यान ट्राफिकचे नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे समजत आहे.

काय झालं प्रमोशनला?

लवरात्री सिनेमाचा ट्रेलर पाहिला असेल तर हा सिनेमा गुजरातच्या मातीशी जोडला गेला आहे. हे चटकन कळतं. त्यासाठीच या सिनेमाच्या प्रमोशनची सुरुवात वडोदऱ्यापासून करण्याचे ठरविले होते. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता आयुष आणि वरिना वडोदऱ्याच्या हरनी एअरपोर्टवर उतरल्यानंतर सुरसागर लेकपर्यंत त्यांनी बाईकवरुन प्रवास केला. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. हेल्मेट न घालता हे दोघे वडोदऱ्यात फिरले. रात्री प्रमोशनचा कार्यक्रम आटपून ते हॉटेलवर परतल्यानंतर विना हेल्मेट प्रवास केल्याप्रकरणी त्यांना १०० रुपये प्रत्येकी दंड वसूल करण्यात आला.

प्रमोशनदरम्यान विना हेल्मेट प्रवास करताना आयुष आणि वरिना( फोटो सौजन्य- टाईम्स ऑफ इंडिया)
वाचा- नवरात्रीत येणार ‘लवरात्री’

काय आहे लवरात्री सिनेमा?

सलमानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा या सिनेमात प्रमुख भुमिकेत असून सहकलाकार वरिना हुसेन आहे. हा सिनेमा एक लव्हस्टोरी असून नवरात्रीशी या प्रेमाची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकचं गुजरातचा फ्लेवर या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

(सौजन्य-salman khan films)

First Published on: August 14, 2018 10:41 AM
Exit mobile version