‘लकी’ सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज

‘लकी’ सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज

'लकी' सिनेमाचे टायटल ट्रॅक झाले रिलीज

‘लकी’ सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले आहे. अभय महाजन-दिप्ती सती या लकी कपलसोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज, सुपरस्टार सई ताम्हणकर आणि सिध्दार्थ जाधव यावेळी उपस्थित होते. पुण्यात झालेल्या या सोहळ्याला पूणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली होती. सचिन पाठकने लिहीलेल्या गाण्याला अमितराज यांनी संगीतबध्द केलं आणि गायलंही आहे. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव आणि उमेश कामत यांच्यावर गाणे चित्रीत झाले आहे. मराठी सिनेसृष्टीतले हे चार सुपरस्टार एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा सिनेमा ७ फेब्रुवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

काय म्हणासे संजय जाधव?

दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “या गाण्याच्या लाँचला खूप भारी प्रतिसाद मिळाला. टाळ्या, शिट्या आणि जल्लोषाने खच्चून भरलेल्या मॉलमध्ये गाण्याचे लाँच करण्याचा अनुभव अद्भूत होता. प्रेक्षकांनी माझ्यावर आत्तापर्यंत जे प्रेम केले आहे, त्याचा मी ऋणी आहे. मला विश्वास आहे, लकी सिनेमाला ते असाच भरभरून प्रतिसाद देतील.” निर्माते सुरज सिंग म्हणाले, “आम्ही खूप लकी आहोत की, आमच्या सिनेमाला रिलीज होण्याअगोदर रसिकांचे एवढे प्रेम मिळते आहे. या प्रेमाने आता हुरूप आला आहे. लकी सिनेमाचे हे टायट्रल ट्रक रसिकांसाठी एक व्हिज्युअल ट्रिट आहे.”

‘मी खूप लकी’

सई ताम्हणकर याविषयी म्हणते, “मी खूप लकी आहे, की संजयदादाच्या बऱ्याच सिनेमांचा मी हिस्सा होऊ शकले. लकी सिनेमाचा मी हिस्सा आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.” तर, सिध्दार्थ जाधव सांगितले की, “दादांच्या सिनेमाचा हिस्सा होणे, मला नेहमीच आवडते. येरे येरे पैसा नंतर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत यांच्यासोबत पुन्हा एकदा या गाण्यानिमीत्ताने काम करता आलंय. आमच्यासाठी हे जणू एक वर्षानंतरचे ‘रियूनियन’ असल्यासारखे आहे.”

‘माझ्यासाठीही ‘तू हिरे’नंतरचे हे रियुनियन’

तेजस्विनी पंडित म्हणते, “फक्त ‘येरे येरे पैसा’च नाही तर सई आणि माझ्यासाठीही ‘तू हिरे’नंतरचेही हे रियुनियन आहे. ‘तोळा तोळा’नंतर चार वर्षानी मी आणि सई एका गाण्यातून पून्हा एकदा एकत्र दिसणार आहोत. आम्ही लकी आहोत, की आम्ही सगळेच संजयदादाच्या कुटूंबाचा हिस्सा आहोत.” तर, उमेश कामत म्हणला की, “लकी सिनेमा सुरू होण्याच्याअगोदरच मी एका व्हिडीयोतून म्हणालो होतो, की मी ‘लकी’ असणार आहे. मी खरंच स्वत:ला लकी समजतो की, संजयदादासोबत मला पून्हा पून्हा काम करता येतं. सई, सिध्दू, तेजस्विनी आणि माझ्यावर चित्रीत झालेलं हे गाणे नक्कीच तुम्हांला आवडेल.”


हेही वाचा – ‘लकी’ बॉय चैतन्यचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे रिलीज!

First Published on: January 28, 2019 5:57 PM
Exit mobile version