घरमनोरंजन‘लकी’ बॉय चैतन्यचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे रिलीज!

‘लकी’ बॉय चैतन्यचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे रिलीज!

Subscribe

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे झाले रिलीज

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. ‘दुनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव यांच्या ‘लकी’ सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. सूर नवा ध्यास नवा रिएलिटी शोमधून दिसत असलेल्या चैतन्यचे हे पहिले मराठी गाणे आहे. गीतकार ‘यो’ (सचिन पाठक) च्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिले असून आळंदीच्या चैतन्य देवढेने याला स्वरसाज चढवला आहे. लकी चित्रपटात हे गाणे अभय महाजनवर चित्रीत करण्यात आले आहे.

‘लकी’ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

- Advertisement -

या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता. आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना चैतन्यचा आवाज खूप आवडला. आळंदीच्या चैतन्यला आवाजाचे दैवी देणगीच मिळाली आहे. त्याच्या आवाजातली निरागसता या गाण्याला अगदी साजेशी आहे आणि अभयने ही हे गाणे रूपेरी पडद्यावर उत्तम साकारलंय.

सूरज सिंग, लकी सिनेमाचे निर्माते

नव्या प्रतिभेसोबत काम करायला मला आणि संजयदादांना नेहमीच आवडते. चैतन्यची आकलन क्षमता खूप चांगली आहे. त्याने एकाच दिवसात या गाण्याचा रियाज करून गाण्याचे रेकॉर्डिंग केले आणि हे कोंकणी गाणे ऐकताना तो कोंकणी पहिल्यांदाच बोलतोय, असं तुम्हांला अजिबात वाटणार नाही, ही यातली जमेची बाजू म्हणायला हवी.  – पंकज पडघन, संगीतकार

- Advertisement -

मी स्वत:ला खूप लकी समजतो, की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती. तसेच संजयदादांचे सिनेमे देखील पाहिले होते. पण या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असे मी मानतो.  – चैतन्य देवढे

या गाण्यातून चैतन्य देवढेला जसं संजयदादांनी लाँच केले, तसेच गोव्यातल्या प्रतिभेलाही या गाण्यातून रूपेरी पडद्यावर आणलंय. माझ्यासोबत गाण्यात नाचणारे सगळे डान्सर्स गोव्यातले आहेत आणि त्यांची ही पहिली फिल्म आहे. ऑक्टोबरच्या तळपत्या उन्हांत हे गाणं चित्रीत झालंय. पण चैतन्यच्या आवाजातल्या गोडव्यामुळे आणि तिथल्या डान्सर्सच्या चैतन्यामुळे कदाचित डान्स करताना हुरूप येत होता.  – अभय महाजन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -