मराठी चित्रपट सृष्टच्या मदतीला माधुरी दीक्षित आली धावून

मराठी चित्रपट सृष्टच्या मदतीला माधुरी दीक्षित आली धावून

13 वर्षाच्या फॅनने केलेल्या मागणीवर,माधुरीने दिला रिप्लाय

जगात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तसेच या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला असून अनेकांची आर्थिक परिस्थिती देखील बिकट झाली आहे. दरम्यान, कोणत्याही चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सध्या होत नसल्याने चित्रपटसृष्टीत सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार झाली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थीतीत अनेक बॉलिवूड कलाकार , राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. तर आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित मराठी चित्रपटसृष्टीच्या मदतीसाठी धावून आली आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकारांना आर्थिक किंवा अन्नधान्य, किराणा कीट या स्वरुपात मदत करत आहेत. तसेच या मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पदाधिकारी आणि संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि बॉलिवूड स्टार्सना मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित मदतीला धावून आली आहे. तिने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला भरघोस मदत केली असून त्यामार्फत आपल्या व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ आणि कलावंतांचे दु:ख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.


हेही वाचा – सुष्मिता सेन २६ वर्षांपुर्वी ठरली मिस युनिव्हर्स; प्रियकराने दिल्या ‘खास’ शुभेच्छा!


 

First Published on: May 23, 2020 2:24 PM
Exit mobile version