माधुरीने पतीसह साजरा केला लग्नाचा वाढदिवस; रोमँटिक अंदाजातील फोटो व्हायरल

माधुरीने पतीसह साजरा केला लग्नाचा वाढदिवस; रोमँटिक अंदाजातील फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजकाल चित्रपटांपासून दूर असलेल्या माधुरी दीक्षितने नुकताच तिच्या लग्नाचा २० वा वाढदिवस तिच्या पतीसह साजरा केला आहे. त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले. या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम नेनेसमवेत रोमँटिक अंदाजात बघायला मिळत आहे. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल होतोय.

सध्या अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या पतीसह अफ्रीकेच्या सेशेल्समध्ये तिच्या 20th Anniversary साजरा करण्यासाठी गेली आहे. सोशल मीडियावर 20th Anniversaryच्या शुभेच्छा देताना माधुरीने फोटो शेअर केले आहे. माधुरीने आपल्या पतीसोबत काढलेल्या खास सेल्फीला नेटकऱ्यांसह चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा विवाह १८ ऑक्टोबर १९९९ साली झाला होता. Anniversary निमित्तच नाही तर माधुरी इतरवेळी सुद्धा आपल्या पतीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या या फोटोमध्ये दोघेही सुंदर दिसत असून माधुरी आणि नेने यांच्यासह त्यांची अरिन आणि रयान हे दोघं मुलं देखील होती. माधुरी आणि तिचा परिवार सेशेल्सच्या समुद्र किनाऱ्यावर तसेच तेथील भागात आपल्या सुट्या आनंदाने घालवताना दिसत आहे.


Video: माधुरी दीक्षितला टक्कर द्यायला आली ‘ही’ ‘दंगल गर्ल
First Published on: October 18, 2019 6:28 PM
Exit mobile version