नेहा कामतचा मालिकेत नवा लुक, व्हिडिओ पोस्ट करताच सोशल मीडियावर चर्चा

नेहा कामतचा मालिकेत नवा लुक, व्हिडिओ पोस्ट करताच सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर मालिकांमधल्या नायिकांची नेहमीच होत असते. झी मराठी (zee marathi) वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ (majhi tujhi reshimgath) ही मालिका सुद्धा प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रार्थना बेहेरे (prarthana behere), श्रेयस तळपदे (shreyas talpade) , प्रदीप वेलणकर (pradeep velankar) आणि संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) या कलाकारांनी ज्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत त्या व्यक्तिरेखा आणि त्यांचं काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. त्याच बरोबर या मालिकेत बालकलाकर असलेली परीने सुद्धा सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहा कामतची (neha kamat) भूमिका साकारत आहे. नुकताच या मालिकेत नेहा आणि यश यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. त्या मुळे या मालिकेत आनंदी वातावरण आहे. आणि त्या नंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा मालिकेतील नवा लुक समोर आला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (prarthana behere) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कातही असते. नुकताच प्रार्थनाने सोशल मीडियावर तिच्या नेहा या व्यक्तिरेखेचे व्हिडीओ शेअर केले आहेत. यात प्रार्थना छान तयार होताना दिसते आहे, त्यात हेअर ड्रेसर सुद्धा दिसतेय जी प्रार्थनाचे केस सेट करते आहे. यात नेहाने म्हणजेच प्रार्थनाने एक छान डिझायनर साडी परिधान केली आहे. यात प्रार्थना छान नटून थटून तयार होताना दिसते आहे. तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये प्रार्थना मंगळसूत्र आणि बांगड्यांकडे बघताना दिसते आहे. प्रार्थनाचे हे व्हिडिओ पाहून ती नेहा कामत प्रमाणेच नेहा चौधरी ही भूमिका सुद्धा एन्जॉय करताना दिसत आहे. या दोन्ही व्हिडिओला कॅप्शन देत ‘नेहाचे नवीन रूप’ असे म्हटले आहे. प्रार्थनाच्या या लुकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. तिच्या चाहत्यांना सुद्धा तिचा हा लुक आवडला आहे. प्रार्थना याही रूपात अगदी सुंदर दिसते आहे.

माझी तुझी रेशीमगाठ (majhi tujhi reshimgath) या मालिकेची गोष्ट सध्या एक छान, सुखद अश्या ट्रॅकवर आहे. नेहा आणि यश यांचा विवाह सोहळा सुद्धा धाटमाटात पार पडला आहे. त्यामुळे चौधरींच्या पॅलेस मध्ये आता आनंदी क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील समीर आणि शेफाली यांची जोडी सुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. प्रार्थनाच्या या व्हिडिओ मुळे आणि तिच्या या नवीन लुक मुळे आणि मालिकेत सुरु असलेल्या या ट्रॅक मुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयीची उत्सुकता वाढली आहे. या मालिकेचे आगामी भाग सुद्धा अत्यंत रंजक असणार आहेत.

 

 

First Published on: June 17, 2022 9:50 PM
Exit mobile version