मलायका आणि अर्जूनने गूपचूपच उरकलाय साखरपुडा…… फोटो व्हायरल

मलायका आणि अर्जूनने गूपचूपच उरकलाय साखरपुडा…… फोटो व्हायरल

बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांचे नाते आता जगापासून लपून राहिलेले नाही. सुरुवातीला दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगलं होतं मात्र आता दोघांनीही उघडपणे त्यांचे नाते जाहीर केले आहे. मलायका आणि अर्जूनने त्यांच्या नात्याला सर्वांसमोर कबुली दिली असली तरी त्यांनी त्यांचा साखरपुडा गूपचूप उरकला आहे. मलायकाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधान आले आहे. मलायकाने पोस्ट केलेल्या या फोटोत तिच्या हातात एक अंगठी पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मलायकाने हातात अंगठी असलेला स्वत:चा फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांमध्ये मलायका व अर्जून च्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु आहे.


हे वाचा- सचिन खेडेकर यांनी ‘ताऱ्यांचे बेट’चित्रपटच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त शेअर केला एक दिलखुलास व्हिडिओ

First Published on: April 14, 2021 7:19 PM
Exit mobile version