मलाइका-अर्जुन कपूर या खास कारणामुळे पुन्हा चर्चेत

मलाइका-अर्जुन कपूर या खास कारणामुळे पुन्हा चर्चेत

अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलाइका अरोरा बिनधास्त लाईफ जगतेय. तिच्या आणि अर्जुन कपूरमध्ये काहीतरी चालू असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. आता मलाइका अरोरा सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती ट्रेंडिगमध्ये येण्याचे कारण आहे अर्जुन कपूर. डिएनए वेबसाईटने याबद्दलचे वृत्त दिलेले आहे. कलर्स वाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या शो चा आठवा सीझन कालपासून सुरु झाला आहे. या शोचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे परीक्षक दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री मलाइका अरोरा आणि खासदार किरण खेर.

चर्चेचे कारण की,

इंडियाज गॉट टॅलेंट शोच्या प्रीमीयर दरम्यान ‘नमस्ते इंग्लड’ची टीमही उपस्थित होती. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांना देखील परीक्षक पॅनेलवर बसण्याची संधी मिळाली होती. याआधी देखील दोघांनी या शोला हजेरी लावलेली आहे. मात्र यावेळी कारण काही खास होते. ते म्हणजे मलाइका आणि अर्जुनमध्ये बहरलेले नाते. परिक्षक पॅनेलवर अर्जुनने परिणीती ऐवजी मलाइकाच्या शेजारी बसणे पंसत केल्यामुळे चर्चेला अजूनच उधाण आले आहे. कालच्या शो दरम्यान ट्वेर्क डांसरच्या परफॉर्मन्सनंतर शोचे सूत्रसंचालक रित्विक धंजानी आणि भारती सिंह यांनी मलाइका आणि अर्जुन कपूरला स्टेजवर बोलावले. त्यानंतर दोघांनीही स्पर्धकांसोबत एकत्र डांस केला.

हे वाचा – आता ‘मुन्नी’ पुन्हा होणार बदनाम!

यावेळी मलाइक आणि अर्जुन कपूर यांनी हातात हात घालून स्टेजवर एंट्री केली. त्यानंतर ट्वर्क डांसच्या काही स्टेप्स देखील त्यांनी शिकून घेतल्या. यातील विशेष बाब अशी की, कलर्स टिव्हीचे ट्विटर हँडल शोचे मिनिट टू मिनिट अपडेट्स देत असते. मात्र यावेळी त्यांनी मलाइक आणि अर्जूनची एकही क्लिप शेअर केलेली नाही. त्यामुळे उत्सुकता आणखीन ताणली गेली आहे.

लॅकमे फॅशन विक २०१८ च्या सोहळ्यापासून मलाइक आणि अर्जुनच्या बाबत अफवांना उधाण आले आहे. या सोहळ्याला ते एकमेंकाच्या बाजुला बसले होते. आपल्या नात्याबद्दल दोघांनीही लोकांना काहीच कल्पना दिलेली नाही. मात्र वर्षभरापासून ते एकमेकांच्या घरी जात येत आहेत. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल जाहीर वाच्यता केली नसली तरी आपल्या नात्याला नकारही दिलेला नाही. त्यामुळे ‘प्यार किया तो डरना क्या’ असाच दोघांचा अॅटिट्यूड दिसत आहे.

हे वाचा – मलाइकाच्या या ‘फिगर’ फोटोवर, चाहते फिदा

मलाइक आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. त्याआधी एकवर्षापूर्वीच त्यांनी एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. मलाइका आणि अरबाजच्या फारकतीचे कारण अर्जुन कपूर असल्याचे तेव्हापासून बोलले जात आहे.

First Published on: October 21, 2018 12:18 PM
Exit mobile version