घरमनोरंजनमलाईकाच्या या 'फिगर' फोटोवर, चाहते फिदा

मलाईकाच्या या ‘फिगर’ फोटोवर, चाहते फिदा

Subscribe

मलाईकाच्या चाहत्याने तिचा हा भन्नाट लूक, एखाद्या 'जलपरी' सारखा असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे.

बॉलीवूडची हॉट अदाकारा मलायका अरोरा हिचे जगभरात लाखो चाहते आहेत. आजवर हिंदी चित्रपटांमधील एक से एक आयटम नंबरने प्रेक्षकांना घायाळ करणारी ‘मुन्नी गर्ल’, तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. वयाची पन्नाशी गाठलेल्या आणि दोन मुलांची आई असलेल्या मलाईकाने आजही आपली फिगर मेंटेन केली आहे. मलाईकाचा असाच एक ‘फिगर’ फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मलाईकाने एका नामवंत ब्रँडसाठी केलेल्या फोटोशूटमधला हा फोटो असून, तिने तो इन्स्टाग्रावरुन शेअर केला आहे. ‘या’ फोटोमध्ये तिची परफेक्ट फिगर दिसून येत असल्यामुळे, सोशल मीडियावर या फोटोला ‘फिगर फोटो’ म्हणून संबोधलं जात आहे. या फोटोमध्ये मलाईकाने गोल्डन कलरचा सेमी ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे. तिने घातलेल्या ड्रेसच्या प्रकाराला ‘बॉडी हँगिग शिमरी ड्रेस’ असं म्हटलं जातं. मलाईकाच्या चाहत्याने तिचा हा लूक ‘जलपरी’ सारखा असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. मलाईका सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील घडामोडी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

‘हॅलो हॅलो’ मधून केला कमबॅक

नुकत्याचा येऊन गेलेल्या ‘पटाखा’ या चित्रपटात मलाईकाने एक दमदार आयटम साँग केलं होतं. यानिमित्ताने चित्रपटांपासून गेला काही काळ दूर असलेल्या मलाईकाने कमबॅक केला होता. पटाखा चित्रपट फारसा चालला नसला तरी त्यामधील मलाईकचं ‘हॅलो हॅलो’ हे आयटम साँग भाव खाऊन गेलं. मलाईकाच्या ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘नमक इश्क का’, ‘बिडी जलई ले’ या गाण्यांइतकेच तिचे हे गाणेही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -