Hambirrao : मुलांना जगणं शिकवायचं तर ‘हा’ चित्रपट दाखवा; कुशल बद्रिकेच्या पोस्टची चर्चा

Hambirrao : मुलांना जगणं शिकवायचं तर ‘हा’ चित्रपट दाखवा; कुशल बद्रिकेच्या पोस्टची चर्चा

Hambirrao : मुलांना जगणं शिकवायचं तर 'हा' चित्रपट दाखवा; कुशल बद्रिकेच्या पोस्टची चर्चा

मराठी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा अभिनयाने सजलेला हंबीरराव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतोय. शिवरायांच्या स्वराज्याचं आणऱी एक पान उलडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडून जातोय. आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदवीर कुशल बद्रिकेने नुकताच हा चित्रपट पाहिला. कुशल बद्रिके (kushal badrike) सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. अशात त्याच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कुशलने नुकताचं अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (pravin tarde) यांचा ‘हंबीरराव’ (hambirrao)  हा चित्रपट पाहिला आणि तो अक्षरश: भारावून गेला आहे. सध्या कुशलची हीच पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने एक फोटो शेअर करत नेटकऱ्यांना त्यांच्या मुलांना हा चित्रपट दाखवण्याचे एक आवाहन केले आहे.

कुशलने या पोस्टमध्ये लिहिले की, “हंबीरराव” एक दैदीप्यमान सिनेमा. एखादं ऐतिहासिक पुस्तक वाचताना, आपल्या डोळ्यांसमोर काही चित्र उभी रहातात, काही प्रसंग तर चक्क दिसू लागतात, पण “हंबीरराव” हा सिनेमा आपल्याला इतिहासात घेऊन जातो, आपण आपलं अस्तित्व विसरून इतिहास जगू लागतो, त्या लढायांमध्ये एखादी तलवार हाती घेऊन आपणही “स्वराज्याच्या पायरीला” शत्रूचा रक्ताने आणि आपल्या प्राणाने अभिषेक घालावा असं वाटत राहतं.”

”प्रवीण तरडे मित्रा ह्या सिनेमासाठी मी तुझा आणि तुझ्या निर्मात्यांचा, कायम ऋणी राहीन.“इतिहास आपल्याला जगायला शिकवतो”, आपल्या मुलांना जर कसं जगायचं ? हे शिकवायचं असेल तर त्यांना सर सेनापती “हंबिरराव” नक्की दाखवा !!” असा आवाहन कुशलने पोस्टच्या शेवटी केलं आहे.

स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजे आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र अन पाठीवरची ढाल बनून राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा ‘हंबीरराव’ (hambirro) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करतोय. कुशलला देखील हा चित्रपट भावला आहे. दरम्यान कुशलच्या या पोस्टवर आता नेटकऱ्यांकडूनही अनेक कमेट्स येत आहे. आपल्या इतिहासाबद्दलची माहिती पुढच्या पिढीला माहित व्हावी. आपल्याला आपल्या इतिहासाचा अभिमान वाटायला हवा अशा अनेक कमेट्स नेटकरी करत आहेत.

दरम्यान कुशलने चला हवा येऊ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनामनात आणि घराघरात एका लोकप्रिय स्थान निर्माण केले आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून कुशलला ओळखले जाते. कुशल सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. यातील अनेक पोस्टच्या माध्यमातून तो आगामी नाटक, चित्रपट तर कधी पिकनिक प्लॅनची माहिती शेअर करत असतो. तर अनेकदा काही भन्नाट व्हिडिओ, फोटो शेअर करत असतो.


Kajol अन् Nyasa Devgn ट्रोलिंगची शिकार, माय-लेकीच्या फोटोंवर अशा कॉमेंट्स

First Published on: May 29, 2022 4:00 PM
Exit mobile version